मद्याच्या नशेत 'तो' पोलीस चौकीच्या बाहेर निसटला..अन् त्या नंतर जे घडले..पोलीसही चक्रावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

भद्रकालीतील पंचशीलनगरमध्ये झालेल्या भांडणातील दोघांना गंजमाळ पोलिस चौकीत चौकशीसाठी आणले असता यातील एका मद्यपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने पळ काढला. त्यानंतर जे काही घडले त्यावरून पोलीसांनाही धक्का बसला...

नाशिक : भद्रकालीतील पंचशीलनगरमध्ये झालेल्या भांडणातील दोघांना गंजमाळ पोलिस चौकीत चौकशीसाठी आणले असता यातील एका मद्यपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने पळ काढला. त्यानंतर जे काही घडले त्यावरून पोलीसांनाही धक्का बसला...

असा घडला प्रकार

गणेश डगळे (35, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे मृताचे नाव आहे. पंचशीलनगरमध्ये तीन-चार जणांमध्ये घरगुती वादातून दोन दिवसांपासून भांडण सुरू होते. याबाबत गंजमाळ पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना गुरुवारी (ता.21) दुपारी गंजमाळ पोलिस चौकीत चौकशीसाठी आणले. त्या वेळी गणेश मद्याच्या नशेत होता. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो चौकीबाहेर निसटला. त्या वेळी तो रस्त्यात पडला. जखमी झाल्याने त्यास पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणात मृत गणेशच्या नातेवाइकांनी पोलिसांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. पोलिसांनी तो पाणी पिल्यानंतर चक्कर येऊन पडल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्याच्या मागे पत्नी, दोन लहान मुले आहेत. तो पडला असता त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी तो चक्कर येऊन पडल्याचे कारण सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले

घरगुती भांडणातून त्यास गंजमाळ पोलिस चौकीत आणले होते. तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी चौकीबाहेर आला आणि चक्कर येऊन पडला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यास मृत घोषित केले. - साजनकुमार सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे 

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected death of a beating suspect nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस