देवासमान मानलेल्या नवरा आणि सासुकडूनच विवाहितेसोबत अमानुष प्रकार; पती पसार

विनोद बेदरकर
Friday, 22 January 2021

मारहाण केल्याने पत्नीने केली होती पतीची पोलिसांत तक्रार. मनात राग धरुन नराधम पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार की संपूर्ण गाव हादरले. याकामात आईनेही मुलाला साथ दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वाचा नेमके काय घडले?

नाशिक : मारहाण केल्याने पत्नीने केली होती पतीची पोलिसांत तक्रार. मनात राग धरुन नराधम पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार की संपूर्ण गाव हादरले. याकामात आईनेही मुलाला साथ दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

उसवाड येथील रहिवासी विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित पती बापू पुंजाराम बिडगर चारित्र्यावर संशय घेत नेहमी शिवीगाळ करीत मारहाण करायचे. गेल्या डिसेंबर महिन्यातही त्यांच्यात वाद होऊन प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. त्याचा राग संशयिताच्या मनात होता. १० डिसेंबर २०२० ला विवाहितेला सकाळी उठण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून पती बापू व सासू वाल्ह्याबाई यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, तसेच विवाहिता शेडमध्ये गेली असता, संशयिताने विषारी औषध विवाहितेला बळजबरीने पाजले. मुलगा व पुतण्याने त्यांना मनमाड व त्यानंतर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

या प्रकरणी चांदवड पोलिसांत ठार करण्याचा प्रयत्न व विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पती पसार झाला आहे. उपनिरीक्षक पी. एस. कारवाळ तपास करीत आहेत.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicion of character by husband Attempted to kill wife nashik marathi news