
नाशिक : मिशन झीरो अंतर्गत लक्षणे असलेल्या, तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात यश मिळत आहे.
कोरोनाची भीती घालवा दहा मिनिटांत
मिशन झीरो नाशिकअंतर्गत लक्षणे असलेल्या, तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात यश मिळत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे यामुळे संबंधित रुग्ण लवकर बरे होऊन कोरोनाची साखळी खंडित करण्यास मदत होत आहे. महापालिकेच्या सहा विभागांत मंगळवारी २२ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले. २२५ कर्मचारी अभियानात सहभागी झाले. कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतरांना दिला जात असून, त्यासाठी १८ ते ५५ वयोगटांतील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्ती पुढे येत आहेत. प्लाझ्मा दानासाठी ८६६९६६८८०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
तपासणीसाठी पुढे या
नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करून घ्याव्यात. तसेच आवश्यकतेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणीसाठी समाजकल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रुग्णांनी संपर्क करण्याचे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी अध्यक्ष गणेश गिते, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्पप्रमुख नंदकिशोर साखला, बीजेएसचे दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, विजय बाविस्कर, प्रा. प्रशांत पाटील, सचिन जोशी आदींनी केले आहे.
चार हजार ३३४ पॉझिटिव्ह
मिशन झीरो नाशिक अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या चाचण्यांच्या २५ व्या दिवशी एक हजार १५१ नागरिकांच्या तपासणीत १८८ कोरोनाबाधित आढळले. २५ दिवसांत तब्बल ३४ हजार ८६१ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात चार हजार ३३४ पॉझिटिव्ह आढळले.
संपादन : रमेश चौधरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.