जप्त वाहनांच्या मालकांनो! वाहनाची ओळख पटवून घेऊन जा; अन्यथा होणार लिलाव

vehicle.jpg
vehicle.jpg

नाशिक : (ओझर) अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने बकाल अवस्थेत पडून असल्याने पोलिस ठाण्याच्या आवारात सुशोभिकरणास अडथळा निर्माण झाला आहे. अशा पंचावन्न बेवारस वाहनमालकांचा पोलिसांनी शोध लावला असून, पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये वाहनधारकांनी कागदपत्रांसह वाहनाची ओळख पटवून वाहने घेऊन जावीत, असे आवाहन केले आहे. 

वाहनांचे मालक शोधण्याचे काम सुरु

अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांत जप्त केले वाहन पडून आहेत. ती वाहने घेऊन न गेल्यास या दुचाकी, चारचाकी वाहनांचा आठवडाभरात लिलाव होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अपघातग्रस्त व विविध दुचाकी व चारचाकी वाहने विविध गुन्ह्यांत जप्त असून, पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, तसेच वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने बकाल अवस्थेतील वाहनांमुळे सुशोभिकरणास अडथळा येतो. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांना वाहनांचे मालक शोधण्याचे काम दिले. 

त्यानुसार ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ५५ बेवारस वाहनांचा शोध लावला आहे. यासाठी पोलिस उपनिरीक्षक अजय कवडे, नाईक खांडवी, बाळासाहेब पानसरे, बाळासाहेब बागडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com