
नाशिक / सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कठीण काळात सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करत आहे. यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या, थाळ्या, शंखनादही करण्यात आला. मात्र यापैकी काही डॉक्टरांना परिस्थितीचे गांभीर्य नसते तेव्हा असेही प्रकार घडतात. ज्याने कुटुंबियांचा विश्वास उडतोय.
असाच एक प्रकार उघडकीस आला..
राज्य स्काउट आणि गाइडच्या माजी राज्य आयुक्त आणि आदर्श शिक्षिका विजया नारायण देवरे (वय 62) यांच्या दाढेवरील कृत्रिम कॅप तुटल्यामुळे चार दिवसांपासून देवरे दात व दाढदुखीने त्रस्त होत्या. सटाणा शहरातील दातांचे दवाखाने कोरोनामुळे बंद असल्यामुळे त्यांना उपचार मिळू शकले नाहीत. परिणामी, त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना येथील एका एमडी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, त्यांनी देवरे यांच्यावर उपचार न करता नाशिकच्या एका मोठ्या हॉस्पिटलला चिठ्ठी देऊन तेथे हलविण्याचा सल्ला दिला. त्या हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथेही एक तास बाहेरच ताटकळत ठेवून केवळ सटाणा येथील कंटेन्मेंट झोनमधील रुग्ण असल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला व नाशिकमधील इतर मोठ्या हॉस्पिटलमध्येही हाच अनुभव त्यांच्या कुटुंबीयांना आला.
कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप
शहरातील एमडी डॉक्टरने दाखल करून घेतले नाही, विनाउपचार नाशिकला पाठविले व नाशिकलाही खासगी हॉस्पिटलने दाखल न करून घेतल्याने राज्य विजया नारायण देवरे यांचा मंगळवारी (ता. 12) रात्री जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, असा सनसनाटी आरोप (कै.) सौ. देवरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या
कोरोना विभागात भरती
दरम्यान, त्यांच्या जावयाच्या एका डॉक्टर मित्राने आपल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, त्यांना ऑक्सिजन देणे गरजेचे असल्याने व तेथे ती सोय नसल्याने रुग्णाला इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले. रात्री नाइलाजास्तव देवरे परिवाराने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, इतर उपचार न करता त्यांना कोरोना विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांस विलंब झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
देवरे कुटुंब क्वारंटाइन
इकडे संपूर्ण देवरे कुटुंबीयांना होम क्वारंटाइन केले आहे. केवळ दाढीचे दुखणे व कमी रक्तदाबाचा त्रास त्यावर कोरोनामुळे उपचार न मिळाल्याने आम्हा कुटुंबीयांवर ही वेळ आली. अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये, यासाठी प्रशासनाने खासगी डॉक्टरांवर नियमावली करून त्यांना चाप बसवावा, अशी मागणी (कै.) सौ. देवरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.