शिक्षकांच्या कामांची आता दर आठवड्याला ‘शाळा’ ऑनलाइन-ऑफलाइनचा अहवाल द्यावा लागणार

विजय पगार
Tuesday, 29 September 2020

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची आता दर आठवड्याला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर केलेल्या प्रयत्नांचा अहवाल तयार करून प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे. 

नाशिक / इगतपुरी : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची आता दर आठवड्याला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर केलेल्या प्रयत्नांचा अहवाल तयार करून प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे. 

ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणाचा अहवाल द्यावा लागणार 
बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकार, तसेच इतर राज्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने एमएससीईआरटीने ही माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करायचा आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

या कामाची नोंद करावी लागणार 
विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, फोनच्या माध्यमातून कम्युनिटी क्लासेस चालविणे, शिक्षक-मित्र तयार करणे, शाळेमध्ये राबविले जाणारे इतर उपक्रम किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचल, किती तास अभ्यास झाला, शिक्षणाचे माध्यम कोणते याची माहिती द्यावी लागणार आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

अशी करा नोंद 
आठवडाभर केलेल्या कामाची शिक्षकांना http://coid19.scertmaha.ac.in या लिंकवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन झाल्यास दर आठवड्याला शिक्षकांना आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळणार आहे. या पासवर्डच्या आधारे लिंक ओपन करून अहवाल सादर करायचा आहे.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers reporting now every week nashik marathi news