इथं ८ जून नाही.. धार्मिक स्थळं उघडण्याचा 'हा' आहे मुहूर्त..!तयारीवर विरजण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

देशात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर झाले. मात्र, त्याचवेळी देशातील मंदिर- मशिदीसह विविध धर्मीयांची धार्मिक स्थळं सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर शनिवारी (ता 30) रात्रीपासूनच सगळीकडे तयारी सुरू झाली. रविवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी स्वच्छतेसह इतर तयारी सुरू असतांनाच दुपारी उशिरा जिल्हा यंत्रणेने आदेश काढले. काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या तयारीवर विरजण पडले. 

नाशिक : रविवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी स्वच्छतेसह इतर तयारी सुरू असतांनाच दुपारी उशिरा जिल्हा यंत्रणेने आदेश काढले. काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या तयारीवर विरजण पडले. 

शेकडो मंदिरांत शनिवारपासून तयारी सुरू होती..पण..

देशात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर झाले. मात्र, त्याचवेळी देशातील मंदिर- मशिदीसह विविध धर्मीयांची धार्मिक स्थळं सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर शनिवारी (ता 30) रात्रीपासूनच सगळीकडे तयारी सुरू झाली. नाशिक देशातील प्रमुख तीर्थस्थळ असल्याने येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर, साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धेपीठ असलेले सप्तशृंगगडावरील देवी मंदिर, श्री काळाराम मंदिर, चंदनपुरी येथील खंडोबा मंदिर यांसह जिल्ह्यातील शेकडो मंदिरांत शनिवारपासून तयारी सुरू झाली होती.

30 जूनपर्यंत प्रतीक्षा 

सोमवार (ता. 8) पासून मंदिर, मशिदीसह सर्वधर्मियांची स्थळं सुरू होणार असल्याच्या शनिवारच्या (ता.30) वृत्तानंतर सर्वत्र तयारी सुरू झाली. रविवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी स्वच्छतेसह इतर तयारी सुरू असतांनाच दुपारी उशिरा जिल्हा यंत्रणेने आदेश काढून 30 जूनपर्यंत धार्मिक स्थळं बंद राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या तयारीवर विरजण पडले. त्र्यंबकेश्वरला चारही दरवाजावर स्वचछता, सॅनेटायझरची सुरक्षित अंतराचे नियेाजन सुरु इतरही अनेक मंदीरात हीच तयारी सुरु असतांना आणि भाविकांच्या दर्शनासाठी नियोजन कशा पद्धतीने करायचे, याविषयीची तयारी विचारविनियम सुरू असतांनाच सायंकाळी उशिरा मंदीर ३० जूनपर्यत बंदच ठेवण्याचा आदेश आला.

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

तयारीवर विरजण
मंदीर सुरु करण्याच्या तयारीच्या धामधूमीत आदेश येउन धडकल्याने विविध मंदीराच्या तयारीवर विरजन पडले. सायंकाळी सहापर्यंत सगळे चित्र स्पष्ट झाल्याने पुन्हा मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्चमधील सगळे वातावरण लॉकडाउनच्या दोन महिन्यांप्रमाणे राहणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा यंत्रणेने दुपारी सगळ्या तीर्थस्थळांना पत्र देऊन 30 जूनपर्यंत मंदिर सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The temple will be open on 30 June nashik marathi news