
रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात होते. पण त्यावेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे महापालिकेचे कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर
सातपूर (नाशिक) : रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात होते. पण त्यावेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे महापालिकेचे कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब उध्वस्त
अंबड लिंक रोडवर काही दिवसांपासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता वळविण्यात आला आहे. एकेरी रस्त्यावर दोन वे करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. १०) रात्री दुचाकी व टाटा ४०७ टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात नाशिक महापालिकेचे कर्मचारी रोहित पवार यांचा पाचवर्षीय मुलगा प्रणय ठार झाला. पवार रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात होते. विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरडार धडक दिली. यात मुलगा प्रणयचा मृत्यू झाला, तर रोहित पवार व पत्नी गंभीर जखमी झाले.
हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड
अर्धा तास रास्ता रोको
याबाबत ठेकेदाराने सूचनाफलक न लावल्याने टेम्पो भरधाव चालवत दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित कुटुंबास नुकसानभरपाई देण्यासाठी अर्धा तास रास्ता रोको केला. यामुळे गुरुवारी दुपारी पपया नर्सरी ते दत्तमंदिर रस्ता अर्धा तास बंद होता. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे, निरीक्षक हेमंत नागरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO
Web Title: Tempo Bike Accident Five Year Old Boy Killed Satpur Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..