
मनमाड (जि.नाशिक) : यंदा शेतीतून फारसे उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकरी आणि शेतमजूर हतबल झाले आहेत. त्यात कोरोनामुळे सर्वांचेच कंबरडे मोडले. शेतीने पोटापाण्याचा प्रश्न सोडविला नसल्याने रोजगारासाठी गावाकडून शहराकडे स्थलांतर सुरू झाले आहे. कर्जबाजारीपण वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या आशेने तरुणांचा शहराकडे जाण्याचा कल वाढला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात वाढ
कोरोनामुळे संसार, कामधंदे सर्वांचीच घडी विस्कटली. अनेकांना गावाकडे यावे लागले. तर यंदा शेतीनेही साथ दिली नसल्याने शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेले दिसले. शेतीवर खर्च भरमसाठ, मात्र उत्पन्न अत्यल्प येत आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, तर हाती आलेल्या पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे कर्जबाजारीपण वाढत आहे. तर हीच गत शेतमजुरांची झाले आहे. नियमित काम मिळत नाही. दुष्काळग्रस्त तालुका असल्याने मोठे उद्योग व्यवसाय नाही. शेतीला जोडधंदा नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील शेतकरी, तरुण हे शहराकडे कामानिमित्त जात आहेत. काहींनी तर कुटुंबासह स्थलांतर केले आहे. तर काही कुटुंबातील माणसे एकटे राहून हाताला मिळेल ते काम करताना दिसतात. मनमाड, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत कंपनीत, विविध दुकाने, मॉल, हॉटेल, बिगारी काम, हमाली, गाडी, रिक्षा चालवणे, मालाचे गाडे लावणे, भाजीपाला, फळ, फुले विक्री यांसह मिळेल ते काम करताना दिसतात.
पुन्हा शहरांकडे स्थलांतर
घरी शेती आहे; पण पाणी नाही. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही. कर्ज काढून लग्न केले, घर बांधले, शिक्षण केले, तर त्यातल्या त्यात कोरोनाच्या हातचा कामधंदा गेला. घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जबाजारी झाले. घरचे धान्य असले तरी इतर गोष्टी जगण्यासाठी लागतात. त्यामुळे दुकानासह इतर ठिकाणी काम करून कुटुंब निर्वाह करत असल्याचे तरुणांनी सांगितले. तर शेतीचे कामे पाहिजे तसे नसल्याने तर खर्च अधिक लागत असल्याने घरच्या घरीच कामे केली जात असल्याने हाताला काम राहिले नाही. त्यामुळे शेतमजुरांची परिस्थितीही तशीच झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण शहरांमधून गावाकडे गेले आहेत. शहरात परतल्यावर पूर्वीचे काम मिळेल याची खात्री नाही, तर गावामध्ये रोजगाराचे कुठलेच साधन नसल्याने शहराकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर शहराकडे जाताना दिसत आहेत.
याही वर्षी शेतीत उत्पन्न मिळाले नाही. इकडून-तिकडून पैसे घेऊन शेतीत घातले. जे खर्च झाले तेही मिळाले नाही. पोटापाण्यासाठी कामधंदा केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. घरी शेती असतानाही शहरात काम करून पोट भरावे लागत आहे.
-रवी चव्हाण, तरुण कामगार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.