
नाशिक : नाशिकच्या कोरोना टेस्टिंग लॅबला कसलीही अडचण येणार नाही, असा शब्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. त्याचवेळी " टेस्टिंग स्लो-डाउन' करा इथपासून ते साहित्य नाही म्हटल्यावर लॅब बंद ठेवा इथपर्यंतचे सल्ले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर-तंत्रज्ञांना यंत्रणेकडून ऐकावयास मिळाले. अशा अडथळ्यांची शर्यत पार करत याच लॅबने 24 तासांमध्ये इतक्या स्वॅब तपासणीची कामगिरी करून दाखविली आहे.
आठवडाभराचे पुरेल एवढे साहित्य उपलब्ध
नाशिकच्या लॅबच्या साहित्य तुटवड्याचा विषय संपत नाही म्हटल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना महाविद्यालयात जाण्याचे निर्देश दिले. डॉ. जगदाळे यांनी सायंकाळपर्यंत आठवडाभराचे पुरेल एवढे साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. त्यानुसार वेळेत साहित्य उपलब्ध झाले. अडथळ्यांची शर्यत पार करत याच लॅबने 24 तासांमध्ये इतक्या स्वॅब तपासणीची कामगिरी करून दाखविली आहे.
स्त्राव काढण्यासाठी चार तास
धुळ्यामधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि नाशिकमधील लॅब यांच्यातील अडचणी कायम आहेत. दोन्ही ठिकाणी स्वॅबमधील स्त्राव काढण्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. आता मात्र सरकार धुळ्याच्या लॅबसाठी स्त्राव शोषणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणार आहे. पण मूलभूत फरक म्हणजे, धुळ्यातून मिळालेल्या माहितीनुसार तिथल्या तुलनेत नाशिकच्या लॅबमध्ये चारपटीहून अधिक मनुष्यबळ आहे. नाशिककर अकार्यक्षम आहे, याची पिटली जाणारी दवंडी ही किती तोकडी आहे, याचे दर्शन त्यातून घडू लागल्याने यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणालेत...
- धुळे व पुणे येथील ज्या लॅबमध्ये नमुने पाठवले जातात त्या सरकारी लॅब आहेत. त्यामुळे नमुने तेथून तपासून घेण्यामध्ये काहीही प्रत्यवाय नाही.
- लॅबमध्ये काही गोष्टी स्थायी स्वरूपाच्या असतात. काही गोष्टी "कन्सुमेबल' असतात. वेळोवेळी संपत असल्याने त्यांच्यासंबंधी थोडी अनिश्चितता नेहमी असते. अशी स्थिती राज्यातील अनेक लॅबची आहे.
- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत होता, त्यावेळेला एकापेक्षा अधिक लॅब दिमतीला असणे अत्यावश्यक असल्याने वेगवेगळ्या लॅबमध्ये आपण कोटा मंजूर करून घेत होतो. जेणेकरून रिपोर्ट लवकर मिळावेत.
- लॅब चालविणे ही पूर्णपणे तांत्रिक बाब असून, तेथे कोणती सामग्री लागते, याबद्दल तंत्रज्ञांनी आपसात समन्वय ठेवून त्याची जिल्हा रुग्णालयाकडे मागणी नोंदवणे, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेणे व त्याचा पुरवठा लॅबला करणे अभिप्रेत आहे. यापुढे या कारवाईमध्ये अधिक सुसूत्रता राहावी, यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली.
- राज्यातील सर्वच लॅबचा अनुभव पाहाता, प्रत्येक जिल्ह्याला दोन ते तीन तरी लॅब स्वतःच्या हाताशी ठेवणे श्रेयस्कर आहे व त्याचप्रमाणे बहुतांश जिल्हे काम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.