esakal | मेकअपची हौस पडली भारी! चक्क ब्रायडल मेकअप स्टुडिओच फोडला..नेमके काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

bridal makeup.jpg

फॅशन तसेच मेकअपची दुनिया अशी आहे की, एकदा यात पडाल तर त्यातच गुंताल. आपण काय घालतो, कसे दिसतो याकडे महिलांचे नेहमीच लक्ष असते. तसेच मेकअप म्हणजे महिलेचा जिव्हाळ्याचा विषय. आपण सुंदर दिसावे याकडे सर्वांचेच लक्ष असते. पण यात नादात महिला गुन्हेगारीच्या जाळ्यात कशा अडकल्या ते वाचा..

मेकअपची हौस पडली भारी! चक्क ब्रायडल मेकअप स्टुडिओच फोडला..नेमके काय घडले?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : फॅशन तसेच मेकअपची दुनिया अशी आहे की, एकदा यात पडाल तर त्यातच गुंताल. आपण काय घालतो, कसे दिसतो याकडे महिलांचे नेहमीच लक्ष असते. तसेच मेकअप म्हणजे महिलेचा जिव्हाळ्याचा विषय. आपण सुंदर दिसावे याकडे सर्वांचेच लक्ष असते. पण यात नादात महिला गुन्हेगारीच्या जाळ्यात कशा अडकल्या ते वाचा..

असा घडला प्रकार
गुरू गोविंदसिंग महाविद्यालयासमोर संगीता ब्रायडल मेकअप स्टुडिओ आहे. त्यांच्या परस्पर तीन महिलांनी २७ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत स्टुडिओ बनावट चावीने उघडून त्यातील विविध ७० हजारांचे साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी स्टुडिओचालक संगीता भरत लोहार (४१,रा. हरिओम रेसिडेन्सी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अंजली लोहार, पूजा जाधव व स्वाती वानखेडे यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या संशयित महिलांनी बनावट किल्लीचा वापर दुकानातून विविध कंपन्यांचे आयब्रो डिफायनर दोन नग, सेटिंग स्प्रे, आयशॅडो पॅलेट, ब्लशर पॅलेट, कार्बन टोनर, क्रीम्पिंग मशीन, स्ट्रेटनिंग मशीन असे विविध प्रकारचे रंगभूषा साहित्य व यंत्रासह एकूण ७० हजारांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तिघींनी दुकानाचे लॅचलॉक एका बनावट किल्लीद्वारे उघडल्याचास संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

तिघा महिला चोरांवर गुन्हा दाखल

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या संगीता ब्रायडल मेकअप स्टुडिओचे कुलूप बनावट किल्लीचा वापर करत उघडून दुकानामधील विविधप्रकारचे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे साहित्य तिघा महिला चोरांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

संपादन - ज्योती देवरे