"घरी कोणी नाही तुम्ही या!"...अन् मग 'ती'ने 

Theft by home lady servant.jpg
Theft by home lady servant.jpg

नाशिक : गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामागील आनंद व्हिला बंगल्यातील मोलकरीणने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत साथीदारांच्या मदतीने दागिने, रोकड अशा 51 लाखांच्या ऐवजासह तिजोरीच पळविल्याचे उघड झाले.
याप्रकरणी गुन्हे शाखेने मोलकरणीसह चौघांना अटक केली असून, तिच्यासोबत चोरी करणाऱ्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

असा आहे प्रकार

रोमेश लुथरा (रा. आनंद व्हिला, थोरात सभागृहामागे, गंगापूर नाका) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.27) सायंकाळी कुटुंबीयांसह ते बाहेर गेले असता, त्यांच्या आईच्या खोलीत असलेली दागिन्यांची तिजोरीच चोरट्यांनी पळविली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गुन्ह्याच्या प्रकारावरून संशयित बंगल्यातीलच असल्याने, त्याच दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी संशयित मोलकरीण राधा गायकवाड हिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने बालाजी घागरमळे, दत्ता भदर्गे 
यांच्या मदतीने बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली, तर चोरीचे दागिने योगेश पाईकराव, अभिषेक निकम यांच्या मदतीने एका सराफ व्यावसायिकास विकून त्याच्याकडून 25 लाख 75 हजार रुपयांची रोकड घेत, ती आपापसांत वाटून घेतल्याची कबुली दिली. 

25 लाख 75 हजारांची रोकड जप्त

याप्रकरणी मोलकरीण राधाबाई गायकवाड (रा. साई रेसिडेन्सी, ध्रुवनगर, शिवाजीनगर, सातपूर), बालाजी घागरमळे (रा. बंगला नं. 32, सिद्धिविनायक सोसायटीशेजारी, इंदिरानगर), दत्ता भदर्गे (रा. राणेनगर, इंदिरानगर), योगेश पाईकराव (30, रा. समतानगर, बाबाचौक), अभिषेक निकम (रा. मुरलीधर कोट, रामसेतूजवळ, भांडी बाजार) यांना अटक केली. पाचही संशयितांना अटक करून सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडून 25 लाख 75 हजारांची रोकड जप्त केली.  घरफोडीतील दागिने खरेदी करणाऱ्या सराफाच्या मागावर पोलिस असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

अशी झाली उकल 

लुथरा यांच्या बंगल्याच्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र, परिसरात आहेत. गुन्हे शाखेने परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. 
त्यामध्ये काही संशयितांची हालचाल टिपली. दुसरीकडे मोलकरीण राधाबाई हिच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर तिने कबुली दिली. संशयितांनी बनावट चावीने घरफोडी केल्याचे समोर आले होते. त्यावरून चोर घरातीलच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मिळत गेलेल्या महत्त्वाच्या धागेदोऱ्यांमुळे संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com