कळवणला दुकानाचा पत्रा कापून कांदा बियाण्याची चोरी

रविंद्र पगार
Thursday, 8 October 2020

बुधवारी (ता. ७) रात्री चोरट्यांनी किसान ट्रेडर्स या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करत प्रशांत कंपनीचे ३० किलो, तर मालाव कंपनीचे पाच किलो कांदा बी असे सुमारे एक लाख ५५ हजारांचे कांदा बी लांबविले.

नाशिक/कळवण : देवळा रस्त्यावरील नवीन न्यायालयासमोर असलेले किसान ट्रेडर्स दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख ५५ हजारांचे कांदा बी व रोकड असा एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. अतुल रौंदळ यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

बुधवारी (ता. ७) रात्री चोरट्यांनी किसान ट्रेडर्स या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करत प्रशांत कंपनीचे ३० किलो, तर मालाव कंपनीचे पाच किलो कांदा बी असे सुमारे एक लाख ५५ हजारांचे कांदा बी, तर ड्रॉव्हरमधील पाच हजारांची रोकड, असा सुमारे एक लाख ६० हजारांचा माल लांबविला. गुरुवारी (ता. ८) सकाळी अतुल रौंदळ यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता चोरीची घटना झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेनंतर श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. श्‍वानाने कळवण मुख्य रस्त्यापयर्यंत माग दाखविला. कळवण तालुक्यात कळवण खुर्द, शिरसमणी येथेही यापूर्वी अशाच प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

बुधवारी दुपारी दीडला दोन ते तीन व्यक्तींनी कांदा बीबाबत चौकशी केली. त्याचा पेहराव व हावभावावरून ते संशयित वाटत होते. त्या व्यक्ती समोर आल्यास त्यांना नक्की ओळखेल. 
- अतुल रौंदळ, संचालक, किसान ट्रेडर्स 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of onion seeds nashik marathi news