येवल्यात व्यापारी पेठेत दोन दुकानांत चोरी; व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

संतोष विंचू
Monday, 12 October 2020

अज्ञात चोरट्यांनी शहरातील मेनरोड वरील दवाखाना व कापड दुकान फोडून अंदाजे १ लाख रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना मध्यरात्रीच्या(ता.११) सुमारास घडली. येथील काटे मारुती तालमीसमोर हा प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात आठ दुकाने फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले.

येवला (जि. नाशिक)  :  अज्ञात चोरट्यांनी शहरातील मेनरोड वरील दवाखाना व कापड दुकान फोडून अंदाजे १ लाख रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना मध्यरात्रीच्या(ता.११) सुमारास घडली. येथील काटे मारुती तालमीसमोर हा प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात आठ दुकाने फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन दुकाने फोडण्यात चोरट्यांना यश आले आहे. काटे मारुती तालीम समोर मनोकामना कापड दुकान्यात चोरी झाली असून समोरच डॉ. बंब यांच्या दवाखानातही चोरी झाली.

दारुडयांचा अन जुगाराचा अड्डडा
त्यांच्या शेजारी विजय श्रीश्रीमाल व मनीष पटनी याच्या दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न झाला. गंभीर म्हणजे लगतच भाजी मार्केटची इमारत असून याठिकाणी बाजार भरत नसल्याने सद्या दारुडयांचा अन जुगाराचा अड्डडा तयार झाला आहे.येथे चारी बाजुने पत्री ठोकण्यात यावी अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

व्यावसायिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण

याप्रकरणी शहर पोलीस सकाळी घटनास्थळी दाखल झाले आहे.या चोरीच्या घटनेने व्यावसायिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भर बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यावसायिकांतून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in two shops in Yeola nashik marathi news