आश्‍चर्यच ! 'या' भाषेला शिक्षकच नाहीत..विद्यार्थ्यांना मुकताएत अभ्यासाला..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आठवी ते बारावीच्या अभ्यासक्रमात पालि भाषा हा विषय असूनही राज्याच्या मराठवाड्याव्यतिरिक्त इतर भागांतील शाळांमध्ये या भाषेला बगल दिली जात असल्याचे चित्र शैक्षणिक क्षेत्रात आहे. शैक्षणिक संस्था आणि शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळेच भारतातील सर्वात प्राचीन भाषा असलेल्या पालिच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहे. 

नाशिक / विखरणी : आठवी ते बारावीच्या अभ्यासक्रमात पालि भाषा हा विषय असूनही राज्याच्या मराठवाड्याव्यतिरिक्त इतर भागांतील शाळांमध्ये या भाषेला बगल दिली जात असल्याचे चित्र शैक्षणिक क्षेत्रात आहे. शैक्षणिक संस्था आणि शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळेच भारतातील सर्वात प्राचीन भाषा असलेल्या पालिच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहे. 

ज्ञानरचनावादाच्या काळात विद्यार्थ्यांचीच आवड बाजूला 
भारतातील सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ हे पालि भाषेतील "त्रिपिटक' असून, पालि भाषेतील अनेक शब्द मराठीत आल्याचे दिसतात. भारतातील 
सर्वात प्राचीन लिखित पुरावे येथील शिलालेखांत असून त्यांची भाषा पालि आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1912 मध्ये बडोदा संस्थानात पाली विषय सक्तीने शिकवण्यास सुरू केले होते. तसेच विद्यार्थ्यांनी पालि भाषा शिकावी यासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज व न्यू इंग्लिश स्कुलमध्येही पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 रुपये शिष्यवृत्ती देत होते. 

नितीपर शिकवण 
पाली भाषा भारतातील खूप इ. स पूर्वीच्या प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी आजही पालि त्रिपिटकाचा आधार घ्यावा लागतो. पालि भाषेत भगवान बुद्धांची आजच्या काळातही लागू पडत असलेल्या नितीपर शिकवण याच भाषेत आहे. भारताची प्राचीन संस्कृती, राहणीमान, समाजव्यवस्था, राजकीय व्यवस्था, उद्योगधंदे, शिल्पकला, अलंकार, मनोरंजनाची साधने, सामाजिक आणि धार्मिक जीवनाचा भाग हा पाली साहित्यात बघायला मिळतो. 

शिकायला सोपी 
शासन दरबारी इरत भाषांना दिला जाणारा निधी पालि विषयास केंद्र व राज्य शासनाकडून मिळत नाही, यामुळे शाळांमध्ये पालि विषय निवडला असला तरी शिक्षक नसल्याची कारणे देऊन वेगळा विषय घेण्यासाठी भाग पाडले जाते. महाराष्ट्रात फक्त मराठवाडा विभागातच पालि भाषा माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात शिकविली जाते. विशेष म्हणजे तेथे विद्यार्थी दहावी व बारावीला पालि भाषा घेऊन चांगले गुण प्राप्त करत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे पालि भाषेतील व्याकरण हे इतर भाषांपेक्षा खूप सोपे आहे. त्यामुळे पालि भाषा ही शिकायला सोपी जाते. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण 
पालि भाषेचा अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास विद्यार्थ्यांना पालि साहित्यात असलेली नीती शिकवण व वैज्ञानिक दृष्टीकोन शिकायला मिळू शकेल. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील विद्यापीठांतून दरवर्षी पालि विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होतात. 

"शासनाने अभ्यासक्रमात पाली भाषा सक्तीची केल्यास प्राचीन भारताचा इतिहास सर्व जगासमोर येईल व दरवर्षी हजारो विद्यार्थी जे एम ए पाली करतात त्यांना हक्काची नोकरीही मिळू शकेल. - ललिता तांबे, पालि भाषा विद्यार्थीनी, मुंबई विद्यापीठ 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

पालि विषय अभ्यासताना व्यक्तीला नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, संविधानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मूल्यांची जाणीव होते. पाली भाषा शासनाने सक्तीची केल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास सर्वांना परिचित होऊन वैज्ञानिक विचारसरणीची पिढी तयार होण्यास हातभार लागेल. - प्रा. माधव मेश्राम, वेणूताई चव्हान प्रतिष्ठान संचलित, कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no teachers for this language nahsik marathi news