" सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही" खासगी हॉस्पीटल संदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही. सरकारने GR मध्ये त्वरित सुधारणा केली तर खाजगी हॉस्पिटल्सला चाप बसेल, कोविड केअर सेंटर नुसते उभारून चालणार नाही,त्याठिकाणी ऑक्सिजन सह इतर व्यवस्था हव्यात असेही फडणवीस म्हणाले.

नाशिक : सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही. सरकारने GR मध्ये त्वरित सुधारणा केली तर खाजगी हॉस्पिटल्सला चाप बसेल, कोविड केअर सेंटर नुसते उभारून चालणार नाही,त्याठिकाणी ऑक्सिजन सह इतर व्यवस्था हव्यात असेही फडणवीस म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. 8) नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.  यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन सोबत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस @ नाशिक - 
यावेळी फडणवीस यांनी शहीद जवान सचिन मोरे यांना श्रद्धांजली दिली
त्यानंतर ते म्हणाले, ICMR नं अग्रेसिव्ह टेस्टिंगची गाईडलाईन दिली आहे. टेस्टिंगचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच रुग्णांना बेड आणी टेस्ट रिपोर्ट वेळेवर मिळत नाही. हे रिपोर्ट 24 तासात येणं आवश्यक असून रिपोर्ट वेळेवर येत नसल्यानं, उपचार सुरू होत नाही त्यामुळे मृत्युदर वाढतो

खाजगी हॉस्पिटलमध्ये अवाजवी बिलांचा मोठा फटका बसतोय

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून जादा बिलिंगच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने समिती नेमावी. या समितीने प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलिंगची खातरजमा करून संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची सूचना देतानाच, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर बारकाईने लक्ष्य ठेवण्यच्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, शहरातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी खाटांची कमतरता असून, त्याबाबत चिंता व्यक्त करताना, मालेगावसह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामकाजाचे कौतूक करीत समाधानही व्यक्त केले. कोवीड पार्श्वभूमीवर याचा गैरफायदा खाजगी हॉस्पिटल घेताय असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस PC @ नाशिक - 
- अँटिजिन किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होताय
- सर्व हॉट स्पॉट वर तातडीने तपासणी केली पाहिजे
- तर परिस्थिती नियंत्रणात येईल
- नाशिक क्रिटिकल स्टेज मध्ये
- प्रशासनाची तयारी नुसती कागदावर नको
- अधिकाऱ्यांच्या बदल्यात गडबड म्हणजे कुरघोडी आणि संवाद हीनता
- पवार साहेबांना मध्यस्थी करावी लागते हे दुर्दैव
- 3 पॉवर सेंटर असल्यानं हे होतंय
- केंद्र सरकारने राज्य सरकारला भरीव मदत दिली
- याची पुस्तिका छापली

- बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक राहिला नाही

नाशिकसह जळगाव व धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राज्यभरातील दौऱ्यात सरकारवर टीका करणारे फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते..ते म्हणाले..
- हे सरकार अंतरविरोधानं पडेल
- सामना छापतो देव पळून गेले,आणि उद्धव ठाकरे विठ्ठलाला साकडं घालतात- सामनाला बेस नाही
- बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक राहिला नाही
- आताचे अग्रलेख कसे छापले जातात  हे सगळ्यांना माहिती आहे

सिव्हिलबाबत समाधान
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु वाढत असले तरी मृत्युदर आवाक्यात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेंटरची सुविधा असून, मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा तर सिव्हीलकडून पाच व्हेंटिलेटरची सोय आहे. अतिरिक्त दहा व्हेटिंलेटर मंजूर करण्यात आले आहेत. सिव्हिलसाठी दोनशे लिटरची ओटी-टँकला मंजुरी मिळालीआहे. त्यामुळे अत्यवस्थअवस्थेतील कोविड रुग्ण वाचविण्यात आल्याचे यावेळी डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले. तर, फडणवीस यांच्यासह खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no point in just auditing by the government said by Devendra Fadnavis