आश्चर्यच! पीपीई सूट घालून ज्वेलरी शॉपमध्ये चोरट्यांचा अक्षरश: धुमाकुळ; पण प्लॅन फसला!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

चोरट्यांनी आता चोरीची नवी शक्कल शोधली असून चोरटे पीपीई किटचा वापर करून दुकानात घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले .यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. या घटनेमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक : चोरट्यांनी आता चोरीची नवी शक्कल शोधली असून चोरटे पीपीई किटचा वापर करून दुकानात घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले .यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. या घटनेमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पीपीई किट घालून चोरट्यांचा धुमाकुळ

(ता.१३) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी टाकळीरोड वरील मोहिनीराज ज्वेलर्सच्या दुकानापुढे एक कार उभी करत ज्वेलर्सच्या दुकानाचे ग्रील कापून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील लॉकरदेखील फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र लॉकर फोडणे त्यांना शक्य झाले नाही. दिवस उगविल्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची ये-जा सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानातून बाहेर येत कारमधून पोबारा केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी मालक नेहमीप्रमाणे आले असता त्यांना ग्रील तुटलेले दिसल्याने दुकानफोडी झाल्याचा संशय आला. तत्काळ त्यांनी भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सीसीटीव्ही फोडले

जेलरोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये हर्षल प्रकाश बाबर यांच्या मालकीचे तेजस्वी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बाबर यांना सकाळी त्यांच्या शेजारच्या दुकानमालकाने त्यांना फोनवरून दुकानाच्या ग्रीलच्या लोखंडी पट्ट्या कापलेल्या दिसून आल्या. तसेच दोन सीसीटीव्ही कॅमेरेही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चोरटे अल्टो कारमधून आले. त्यांनी ग्रीलचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला; मात्र शटर उचकटले नसल्याने व जॉगर्सदेखील ये-जा करु लागल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला. बाबर यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.",

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. तत्काळ पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्याअधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. या दुकानफोडीच्या प्रयत्नात सुदैवाने दागिणे, रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकरणी दुकानमालक सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

चोरट्यांचा प्लॅन फसला

शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील मोहिनीराज ज्वेलर्स हे दुकान गुरुवारी (दि.१३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी मोटारीतून पीपीई सूट घालून येत दुकानाच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी ग्रील तोडले. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला; मात्र लॉकर फोडता आले नाही आणि रस्त्यांवर नागरिकांचा वावर असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरटे फरार झाले. अशाच पध्दतीने चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास जेलरोडवरील एक सराफी दुकानही फोडल्याचे उघडली.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves robbery into a jewelery shop wearing PPE suits nashik marathi news