चिंताजनक! जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद; तर 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Sunday, 13 September 2020

दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ५६९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर एक हजार ६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पंधरा रुग्णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दरम्‍यान, ॲक्टिव्ह रुग्‍णसंख्येतही वाढ झाली असून, सद्य:स्‍थितीत जिल्ह्या‍त दहा हजार ४१५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पंधराशेहून अधिक रुग्ण आढळताना शनिवारी (ता.१२) एका दिवसात आढळणाऱ्या रुग्‍णसंख्येचा नवा उच्चांक गाठला गेला. दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ५६९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर एक हजार ६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पंधरा रुग्णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दरम्‍यान, ॲक्टिव्ह रुग्‍णसंख्येतही वाढ झाली असून, सद्य:स्‍थितीत जिल्ह्या‍त दहा हजार ४१५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

एक हजार ५६९ नवे बाधित

शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ५०, नाशिक ग्रामीणचे ४४६, मालेगाव ७२, जिल्‍हाबाह्य एक बाधित आढळून आला. बऱ्या झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ८१७, नाशिक ग्रामीणचे २३०, मालेगावचे १६, तर तीन जिल्‍हाबाह्य रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पंधरा मृतांमध्ये नाशिक शहरातील पाच, नाशिक ग्रामीणचे नऊ, तर जिल्‍हाबाह्य एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दरम्‍यान, शनिवारी दिवसभरात आढळलेल्‍या संशयित रुग्णांची संख्या लक्षणीय राहिली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

बरे झाले एक हजार ६६ रुग्ण 

महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार ६६०, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ३३८, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात ४५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ११, जिल्‍हा रुग्णालयात चार संशयित दाखल झाले आहेत. प्रलंबित अहवालांचे प्रमाण पुन्‍हा वाढले असून, सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९३३ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी एक हजार १८२ अहवाल नाशिक ग्रामीणचे, ४६६ शहरातील, ३८५ मालेगाव येथील रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the third day in a row More than fifteen hundred corona positive in nashik marathi news