माजी खासदारांना ठार करण्याची धमकी; फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; गृहमंत्री देशमुखांकडे तक्रार

योगेश मोरे
Thursday, 17 September 2020

रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्याने परत येत असताना, त्यांच्या मोबाईल क्रमांक ९०७५८७०१२१ वर फोन आला. त्यावरून त्यांना ठार करण्याची धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. समोरून बोलणाऱ्याने नंतर फोन कट केला. त्यानंतर...

नाशिक / म्हसरूळ : रात्री साडेनऊच्या सुमारास धोंडेगाव व गिरणारे या रस्त्याने परत येत असताना, त्यांच्या मोबाईल क्रमांक ९०७५८७०१२१ वर फोन आला. आणि त्यानंतर...

माजी खासदारांना ठार करण्याची धमकी 
देवीदास पिंगळे यांची बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाली आहे. बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर येथील जागेत शुक्रवारी (ता. १८) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे. या जागेची पाहणी आणि कार्यक्रमाची तयारी बघण्यासाठी सभापती पिंगळे मंगळवारी (ता. १५) सायंकाळी पाचला संचालकांसह गेले होते. त्या जागेची पाहणी करून आल्यानंतर ते संचालक दिलीप थेटे यांच्या शेतावर गेले. तेथून ते रात्री साडेनऊच्या सुमारास धोंडेगाव व गिरणारे या रस्त्याने परत येत असताना, त्यांच्या मोबाईल क्रमांक ९०७५८७०१२१ वर फोन आला. त्यावरून त्यांना ठार करण्याची धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. समोरून बोलणाऱ्याने नंतर फोन कट केला. पिंगळे यांनी त्या क्रमांकावर दोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो फोन उचलला नाही. त्या व्यक्तीने ठार करण्याची धमकी व शिवीगाळ केली असल्याने त्या व्यक्तीकडून माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. बाजार समिती संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यात, या घटनेचा निषेध करण्यात आला. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार

माजी खासदार व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना मोबाईलवरून ठार करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे, तसेच या धमकीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे समजते. 

मोबाईलवरून मला ठार करण्याची धमकी आणि अर्वाच्य शब्द वापरून शिवीगाळ करण्यात आली. त्यास काहीही प्रत्युत्तर दिले नाही. या धमकीची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकारामागे कोण आहे, त्यात कोणाचा हात आहे, याचा सखोल तपास होऊन पोलिस योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे. -देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती  
 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threats to kill former MP devidas pingle nashik marathi news