धक्कादायक! गळ्याला तलवार लावून भररस्त्यात लूट; वर्दळीच्या रस्त्यावर घटनेमुळे खळबळ

संतोष विंचू
Wednesday, 28 October 2020

रात्री काम संपवून घरी निघालेल्या फरसाण व्यापाऱ्यास भर वर्दळीच्या रस्त्यावर तलावारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक/येवला : काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरासमोरून क्रूझर गाडीसह अनेक दुचाकींची चोरी झाली आहे. भरव्यापारी पेठेत कापड दुकाने फोडल्याची घटनाही नुकतीच घडली. त्यापाठोपाठ ही लुटमारीची घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.

फरसाण व्यावसायिकाची लूट

पटेल कॉलनीतील संजीवनी शाळेजवळ दुकान बंद करून घरी जाणाऱ्या फरसाण व्यावसायिक सागर कायस्थ यांना तीन चोरट्यांनी भररस्त्यात अडवून तलवारीच्या धाकाने लुटले. यामध्ये तब्बल चार लाख ८० हजारांची लूट झाली असून, वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे

रात्री नऊच्या दरम्यानची घटना

विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाणचे संचालक सागर कायस्थ (३५, रा. पटेल कॉलनी) रात्री नऊच्या दरम्यान दिवसभराचा दुकानाचा गल्ला अंदाजे ७० हजार रुपये व व्यापाऱ्यास देण्यासाठी घरून आणलेले दोन लाख रुपये असे एकूण दोन लाख ७० हजार रुपये पिशवीत घेऊन दुचाकीने (एमएच १५/ एफवाय ८३११) घराकडे जात होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

नेमके काय घडले?

पटेल कॉलनीतील संजीवनी शाळेजवळून रस्त्याने जात असताना मागून तोंडाला काळे कापड बांधून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी सागर यांची दुचाकी आडवली. एकाने दुचाकीच्या हँडलला असलेली पैशाची पिशवी काडून घेतली, तर दुसऱ्याने तलवार मानेस लावून सागर यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची दोन लाखांची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून घेतली. पँटच्या खिशातील दहा हजारांचा मोबाईलही काढून घेतला. झटापटीत दुचाकी खाली पडली, तर सागर यांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमा होऊ लागताच चोरट्यांनी पळ काढला. सागर कायस्थ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत लुटीचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thieves robbed the merchant nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: