घोटी टोलनाक्याला लागणार टाळे! ग्रामपालिकेकडून कारवाईचा बडगा 

पोपट गवांदे
Friday, 15 January 2021

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्याला सोमवार (ता.१८) टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र आज (ता. १५) घोटी ग्रामपालिकेने टोलनाका प्रशासनाला दिले आहे.

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्याला सोमवार (ता.१८) टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र आज (ता. १५) घोटी ग्रामपालिकेने टोलनाका प्रशासनाला दिले आहे. टोलनाका ग्रामपालिकेला घरपट्टी कराची रक्कम देत नसल्याने त्याला टाळे ठोकण्याचा ग्रामपालिकेने इशारा दिला आहे. 

ग्रामविकास अधिकाऱ्यांची माहिती

या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम २४ महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० भाग २ पोट नियम १५ अन्वये शासन निर्णय ११ डिसेंबर १९१५ नुसार निवासी व व्यावसायिक बांधकामाची कर आकारणी केल्यानुसार टोलनाका, स्टोअररूम, टोलनाका शेड मिळकत क्रमांक ३८९८ ची मागील थकबाकी ७०६, ५४० व चालु ८५,५८० एकूण ७९२,३२० रक्कम भरलेली नाही. याबाबत घोटी ग्रामपालिका कार्यालयाने २५ सप्टेंबर २० रोजी नोटिशीद्वारे टोलनाका प्रशासनाला कळविले होते. मात्र, अद्यापपर्यंत रक्कम अदा केली नसल्यामुळे कारवाईचा बडगा ग्रामपालिकेने उगारला आहे. एकूण ७ लाख ९३ हजार ३२० रक्कम वसूल करण्यासाठी घोटी ग्रामपालिका १८ जानेवारीला घोटी टोलनाक्यास टाळे ठोकणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी धुंदाळे यांनी दिली. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll plaza at Ghoti will be closed nashik marathi news