नाशिक जिल्ह्यातील घाट परीसर बहरले; रोजगार देणारं पर्यटन मात्र दुर्लक्षित

Tourism in rural areas is neglected
Tourism in rural areas is neglected
Updated on

गिरणारे/गंगापूर : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील हरसूल, जव्हार, दोनवाडे, दमनगंगेचा घाट हिरवागार व रम्य परिसर म्हणून ओळखला जातो, घाटातील पर्यावरण व शुद्ध हवा, वळणदार रस्त्याचा हा रम्य परिसर पर्यटनाच्या दृष्टीने नेहमी दुर्लक्षित आहे. या घाट, जंगलाचा परिसर स्थानिक गावांसाठी रोजगाराचे दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतांना पर्यटन महामंडळ, वनविभाग व लोकप्रतिनिधींकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हे नैसर्गिक घाट सौंदर्यही असुरक्षित व दिवसागणिक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीच जर्नलिष्ठ फोरम, शेतीमाती परिवार व भारतीय वृक्ष संवर्धन संस्थेने केली आहे,

आदिवासी भागात पर्यटनाच्या संधी

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यांतील निसर्गसंपदा, डोंगर जंगले, घाट, धरणे, वाडे, पाडे, नदया, धबधबे एकूणच मनाला शांती देणारा हा रम्य परिसर पर्यावरणीयदृष्टया दिवसागणिक नष्ट होत आहे. नाशिकपासून अवघ्या ५० ते ६० किलोमीटर अंतरावर हरसूल, जव्हारचा घनदाट जंगलाचा घाट आहे, हा घाट घनदाट जंगलाने वेढलेला होता, जंगलात दुर्मिळ पक्षी, वन्यप्राणी होते, मात्र वाढते प्रदूषण व वन विभागाच्या दुर्लक्षामुल जंगलाची होणारी वृक्षतोड, तसेच घाटात शहरातून काही उपद्रवी कडून पडणारा प्लास्टिक घन कचरा यामुळं जंगल नष्ट होऊन याठिकानचे दुर्मिळ पक्षी वन्यप्राणी परागंदा होत आहेत, दमनगंगेचा वळणदार घाट, दोनवाडे घाटात वळणदार दूरवर दिसणारे रंगीबेरंगी मळे, शेतशिवारे, खेडीपाडेहे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

लक्ष घालण्याची अवश्यकता

रंगीबेरंगी फुले, लहान मोठे आकर्षक धबधबे यामुळं या घाटांत मोठे पर्यटन विकसित होऊ शकते. त्यामुळं या आदिवासी भागाला मोठे पर्यटन विकसित होईल मात्र पर्यटन विकास महामंडळ,स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे, दुर्लक्ष झाल्याने हे घाटांचे रम्य पर्यटन दिवसागणिक नष्ट होत आहे, दरम्यान याकडे संबंधितांनी लक्ष घालावे अन्यथा आंम्ही पर्यावरणीय संस्था आंदोलन केल्यावाचून पर्याय नाही असे तुषार पिंगळे, भारत पिंगळे, शेतीमाती मंचाचे एकनाथ बेंडकोळी, साहित्यिक देवचंद महाले यांनी सांगितले.
हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

आम्ही आमच्या गावात वळणाचा डोंगर घाट वाचवला व तिथे जंगल उभं केलं आज वन्यप्राण्यांसह पक्षी व निसर्गाने हा परिसर गणेशगाव (वाघेरा) येथील फुललेला आहे, जव्हार घाटातील कचरा समस्या गंभीर आहे, कचरा टाकणारे चारचाकीत कचरा आणतात घाटात टाकतात ते दुर्दैवी आहे. पर्यावरणास धोका देणार आहे,यावर कठोरपणे कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे, तर खेड्यापाड्यात रोजगाराची मोठी समस्या आहे, लोक पोटापाण्यासाठी स्थलांतरित होतात त्यांना पर्यटन विकासातून रोजगार मिळेल फक्त शासन लोकप्रतिनिधींनी डोळे उघडे ठेवून हा प्रयत्न केला पाहिजे. - देवचंद महाले, पर्यावरण मित्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com