जिल्ह्याला कोरोनाची मगरमिठी...मात्र तरीही 'हा' परिसर कोरोनामुक्तीकडे?...वाचा हे आहे कारण..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

गैरसमजामुळे ते प्राथमिक उपचार करण्यासही टाळाटाळ करत होते. त्यामुळे कोरोनाबांधितांची संख्या वाढत होती. मालेगाव येथील डॉक्‍टरांनी नेमकी हीच भीती नागरिकांच्या मनातून काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी स्वतःहून त्यांच्याकडे उपचार घेण्यास सुरवात केल्याने रुग्णांच्या आकडेवारीत कमालीचा फरक दिसत आहे. 

नाशिक : (जुने नाशिक) काही दिवसांपासून कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या जुने नाशिकमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. या भागात राबविलेल्या मालेगाव पॅर्टनमुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. शहरात कोरोनाबांधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना जुने नाशिक आणि वडाळागावातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने खाली आला आहे. 

कोरोनाबाधितांचा आकडा घटला

जुने नाशिक येथील काही समाजिक संस्था, बडी दर्गा विश्‍वस्तांनी मालेगाव येथील डॉक्‍टरांच्या पथकाला पाचारण केले आहे. वडाळागाव, बडी दर्गा परिसर, दूधबाजार, बागवानपुरा, वडाळा रोड येथील चार ते पाच हजार रुग्णांवर त्यांनी उपचार केले. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबांधितांवर उपचार केले जात आहेत. येथील व्यवस्था व इतर बांधितांच्या संपर्कात आल्यास आपणही बाधित होऊ, असे सामान्य आजाराने पीडित रुग्णांच्या गैरसमजामुळे ते प्राथमिक उपचार करण्यासही टाळाटाळ करत होते. त्यामुळे कोरोनाबांधितांची संख्या वाढत होती. मालेगाव येथील डॉक्‍टरांनी नेमकी हीच भीती नागरिकांच्या मनातून काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी स्वतःहून त्यांच्याकडे उपचार घेण्यास सुरवात केल्याने रुग्णांच्या आकडेवारीत कमालीचा फरक दिसत आहे. 

काय आहे मालेगाव पॅटर्न

डॉक्टरांनी नागरिकांचे गैरसमज दूर केले 

- प्राथमिक उपचार घेण्यास प्रवृत्त केले जाते 

- रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे, सर्दी, खोकला, तापावरील औषध दिले जाते 

- गंभीर रुग्णास हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो 

पंचवटीत मालेगाव पॅटर्नचे प्रयत्न 

पंचवटी सध्या कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. रोज दहा ते वीस कोरोनाबाधीधित रुग्ण येथे आढळत आहेत. जुने नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा पंचवटीत मालेगाव पॅटर्न राबविण्याचा मानस आहे. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विनंती केली जाणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यास त्याठिकाणी आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी प्राथमिक उपचार घेणे आवश्‍यक आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. - डॉ. फैजान अहमद 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Towards old Nashik will be became corona free due to Malegaon pattern nashik marathi news