VIDEO : #COVID19 नाशिकमध्ये शुकशुकाट.. जनता कर्फ्यूला व्यापारांचा प्रतिसाद!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

 शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे मेनरोड, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, दिंडोरीरोड, मखमलाबाद आडगाव  द्वारका, मुंबई नाका,  सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, परिसरातील विविध  दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला.

नाशिक : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी केलेल्या जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाला नशिककरांनी उत्स्फूर्त रविवारी (दि.२२) प्रतिसाद दिला. शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सराफव्यावसायिकांनी गेल्या तीन दिवसांपासून त्यांची शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे बाजारातील प्रतिदिन होणारी ५० कोटी या प्रमाणे जवळपास दिडशे कोटींची उलाढाल ढप्प झाली आहे, परंतु, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी व्यावसायिकांनी राष्ट्र कर्तव्य म्हणून त्यांची दुकाने  स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहे. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. 

 शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे मेनरोड, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, दिंडोरीरोड, मखमलाबाद आडगाव  द्वारका, मुंबई नाका,  सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, परिसरातील विविध  दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला.

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traders People respond to janta curfew due to corona Nashik Marathi news