esakal | लॉकडाऊनमध्येही कंटेनर चालकाने दिली लिफ्ट..अन् 'ते' समोर दिसताच घडला प्रकार!
sakal

बोलून बातमी शोधा

ld nandgaon.jpg

जळगावमार्गे मध्य प्रदेशात नियमित वाहतूक करणाऱ्या कंटेनरपैकी एक कंटेनर असावा, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, या सर्वांची ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी तपासणी केली. 

लॉकडाऊनमध्येही कंटेनर चालकाने दिली लिफ्ट..अन् 'ते' समोर दिसताच घडला प्रकार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / नांदगाव : पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरमधून प्रवास करणाऱ्यांना 27 जणांना बुधवारी (ता. 1) सायंकाळी येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. 

असा घडला प्रकार..
सध्या जिल्हा सीमांतर्गत पायी जाणाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी होत आहे. पुण्याकडून येवलामार्गे जळगावकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरला (आरजे 09, जीबी 3375) औरंगाबाद रस्त्यावर पोलिसांनी थांबविले. कंटेनरची तपासणी केली असता, कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या 27 लोकांना उतरविले. ते मध्य प्रदेश व राजस्थान राज्यातील मजूर असून, त्यांनी पुण्याहून ते संगमनेरपर्यंत पायी प्रवास केला होता. कंटेनर चालकाने लिप्ट दिली, असे 27 प्रवाशांचे म्हणणे असले, तरी कंटेनरचालकाला जादा पैसे देऊन ते प्रवास करीत असावेत. तसेच जळगावमार्गे मध्य प्रदेशात नियमित वाहतूक करणाऱ्या कंटेनरपैकी एक कंटेनर असावा, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, या सर्वांची ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी तपासणी केली. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

तापुरत्या निवारा शेडमध्ये सोय
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या सर्वांची जेवण्यासह राहण्याची व्यवस्था शासनाने उभारलेल्या येथील मविप्रच्या महाविद्यालयातील तापुरत्या निवारा शेडमध्ये करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांनी दिली.  

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!