कोरोनामुळे रुजतोय शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड; मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने लग्नाचा घाट!

marriage.jpeg
marriage.jpeg

नाशिक / दिक्षी : लग्नकार्य म्हटले की धूमधडका...पाहुण्यांची रेलचेल, मानपान, थाटमाट... मात्र गेल्या दोन महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळे विवाह सोहळ्याचा ट्रेंडच बदलला आहे. आता अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकले जात असून ना कोणाता मानपान ना बॅडबाजा यामुळे कोरोनात झटपट लग्नाचा ट्रेंड आता चांगलाच जोरात सुटला आहे. यातून दोन्ही कुटुंबाकडचा वारेमाप खर्चाला लगाम बसला असून वेळेचीही बचत होत आहे. 

वारेमाप खर्चाला लगाम

साधारण दिवाळीनंतर लग्नसराईला सुरवात होते. लग्न म्हटले म्हणजे विविध वस्तूंची जमवाजमव, साखरपुडा, देवकार्य, जागरण गोंधळ, नवरदेव मिरवणूक, हळद, लग्न व वरात, परतमूळ असे विविध कार्यक्रम होतात. यातच काहींचे रुसवेफुगवे, मानसन्मान या गोष्टीही घडतात. यामुळे वधूपित्याबरोबरच वरपित्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा मुलीच्या वडिलांना शेती गहाण ठेवून कर्ज, उसनवारी करून आपल्या मुलीचा विवाह सोहळा बळजबरीने थाटामाटात करावा लागतो. कोरोनात झटपट लग्नाचा ट्रेंड आता चांगलाच जोरात सुटला आहे. यातून दोन्ही कुटुंबाकडचा वारेमाप खर्चाला लगाम बसला असून वेळेचीही बचत होत आहे. 

सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाचा बंधने

यंदा जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदीच्या उपाययोजनेत धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंधने घातली आहेत. त्यात विवाह सोहळा कमीत कमी माणसांमध्ये करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामुळे आता अगदी वधू-वर या दोन्ही कुटुंबांतील ठराविक 30 ते 40 लोकांमध्ये एकाच दिवसात सर्व विधी पार पाडत विवाह सोहळे होत आहेत. 

लाखोंचा खर्च वाचला, पण रोजगारावर गंडांतर 

एकीकडे झटपट लग्नाचा ट्रेंड सध्या वधू आणि वराच्या कुटुंबियांकडून स्वीकारला जात असताना दुसरीकडे याचा इतर व्यवसायांवर मोठा परिणाम होवू लागला आहे. विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले लॉन्समालक, बॅंडवाले, घोडामालक, केटरर्स, वाघे-मुरळी, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेसवाले, कापड दुकानदार, मंडपवाले यांचा तेजीत चालणारा व्यवसाय ठप्प होऊन त्यांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. 

वर्षभरात फक्त लग्नसोहळ्यातच चांगली कमाई होते. पण यंदा कोरोना आजाराने आमचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. - संजय जाधव, फोटोग्राफर 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com