VIDEO : मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या पिल्लाला आई कशी सोडवणार? व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

monkey mother 1.png
monkey mother 1.png

नाशिक :  लॉकडाऊनदरम्यान अनेक पशूप्राणी रस्त्यावर आणि मानवी वस्त्यांमध्ये खाण्याच्या शोधात येत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी काही निशब्द करणारे असतात तर काही खूपच हसविणारे..  तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

काय आहे व्हिडिओमध्ये?
खाण्याच्या शोधात असलेलं एक माकडाचं पिल्लू आईची नजर चुकवून मस्ती करत जात होते. त्यावेळी अचानक ते वीजेच्या तारेवर अडकले आणि तिथून आपल्या आईकडे जाणे त्याला कठीण झाले. पिल्लू अर्ध्यावर अडकल्याचं पाहून आईचा जीव मेटाकुटीला आला. आई पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड करू लागली. अडकलेल्या पिल्लाला ती कशी वाचवते याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पिल्लाला धीर देते ती आईे...

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. पण हीच आई जेव्हा तिचे पिल्लू संकटात असते..तेव्हा स्वत:च्याही जीवाची पर्वा करीत नाही. पिल्लाला वाचवण्यासाठी आई तारेवर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तार जोरात हलायला लागल्यानं पिल्लू घाबरतं. त्यामुळे आई पुन्हा माघार घेते. पिल्लाला धीर देत हळूहळू पुढे येण्यासाठी सांगते. पिल्लू खूप उंचावर असल्यानं आणि उडी मारण्याचा अंदाज नसल्यानं घाबरतं. आई हळू धीर देत त्याला पुढे येण्यासाठी बळ देते.

पिल्लाला हजार तऱ्हेनं बळ देऊनही जेव्हा ते डगमगतं आणि पडायची आईला भीती वाटते तेव्हा आई स्वत:चा जीव धोक्यात घालून पिल्लाला वाचवते असा हा व्हिडीओ आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com