#CoronaFighters : 'ज्याचं' एकेकाळी घरासकट सगळं गेलं होतं वाहून...'तो' आज देतोय कोरोना कक्षात सेवा

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

(गणुर) पोटापूरती शेती, पावसाळ्यात अतिवृष्टी पण उन्हाळा म्हंटला की पिण्याचे पाण्याचे हाल, शेतीवर पोटाची भूक मिटली नाही की मग मिळेल ते काम करायचे. आर्थिक चणचण असतांना पोराला शिकवलं आज तो डॉक्टर म्हणून कोरोना विरोधातील युद्धात देशाचा शूर शिपाई म्हणून काम करतोय याचा अभिमान असून त्याच्या कामाबद्दल लोकांकडून होणारं कौतुक ऐकलं की केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतं. हे शब्द आहेत डॉ. हेमराज यांचे वडील काशीनाथ दळवी यांचे. 

नाशिक : (गणुर) पोटापूरती शेती, पावसाळ्यात अतिवृष्टी पण उन्हाळा म्हंटला की पिण्याचे पाण्याचे हाल, शेतीवर पोटाची भूक मिटली नाही की मग मिळेल ते काम करायचे. आर्थिक चणचण असतांना पोराला शिकवलं आज तो डॉक्टर म्हणून कोरोना विरोधातील युद्धात देशाचा शूर शिपाई म्हणून काम करतोय याचा अभिमान असून त्याच्या कामाबद्दल लोकांकडून होणारं कौतुक ऐकलं की केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतं. हे शब्द आहेत डॉ. हेमराज यांचे वडील काशीनाथ दळवी यांचे. 

हेमराज यांचा प्रेरणादायी प्रवास

हेमराज सध्या नाशिकच्या कोरोना कक्षात 'कोरोना फायटर्स' म्हणून यशस्वी काम करत आहेत. आई सिंधुबाई व वडील काशीनाथ यांचा हेमराज एकुलता एक मुलगा असून दिंडोरी तालुक्यातील संगमनेर या आदिवासी गावातील त्यांचा जन्म. आजूबाजूची परिस्थिती शिक्षणाला प्रतिकूल, अशात अल्पभूधारक शेतकरी असलेल्या माय-बापाचे काबाड कष्ट बघत हेमराजने शिक्षणाच्या जोरावर ही परिस्थिती बदलायचे स्वप्न बघितले. अतिवृष्टीने झोपडीवजा कुडाचा निवारा वाहून गेला. यात सगळं वाहून गेलं पण एक गोष्ट तरून राहिली ती म्हणजे हेमराजचे स्वप्न. प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिंडोरी तालुक्यात तर उच्च माध्यमिक शिक्षण पंचवटी नाशिक विद्यालयात झाले. वस्तीगृहावर प्रति महिना मिळणारे २०० रुपये अन् घरून मिळणाऱ्या मोजक्या पैशांवर हेमराज यांनी आडगाव मेडिकल कॉलेजला एमबीबीएस तर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. केले. २०१० मध्ये शासकीय वैद्यकीय सेवेते प्रवेश केला. शेकडो रुग्णांच्या सेवेबरोबर त्यांनी आरोग्य विषयक जनजागृतीचे देखील काम केले. 

शिक्षणासाठी प्रेरणा 

कोरोनाच्या संकटाची चाहूल लागताच त्यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात नियुक्ती झाली असून ते पूर्ण ताकदीने या संकटाविरोधात दोन हात करतायेत. एकेकाळी झोपडी वजा घर वाहून गेलेल्या आदिवासी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या मुलाचा प्रवास अनेक आदिवासी बांधवाना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरतोय. या प्रवासात पत्नी हेमलता हिची देखील मोलाची साथ लाभत आहे. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

डॉ. हेमराज यांचा प्रवास जवळून बघितला आहे. अतिशय गरिबी व आदिवासी भागातून डॉक्टर होऊन त्याने आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. आज कोरोना फायटर्स म्हणून लढतांना बघून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. - डॉ. हेमंत घांगळे, न्याय वैद्यक शास्रतज्ञ, जिल्हा रुग्णालय नाशिक

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक
,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal Farmer's son Journey from farmer to Corona Fighters nashik marathi news