
नाशिक : (त्र्यंबकेश्वर) पहाटेची वेळ...सोमा मौळे गाढ झोपेत असतांना बैलाचा वेदनेने विव्हळण्याचा आवाज झाला. अनेक तर्क - वितर्क लावत त्याचा जीव बैलाच्या काळजीने कासावीस झाला. धावत - पळतच ते आवाज येत असलेल्या दिशेला पोहोचले, तर धक्काच...बैलाचा जीव धोक्यात होता मात्र ते हतबल होते. वाचा काय घडले नेमके?
अशी आहे घटना
बुधवारी (ता. २) मौजे खरवळ येथे आंब्याच्या वाडीत सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. सोमा मौळे हे गाढ झोपेत असतांना अचानक बैलाचा जोर जोरात वेदनेने विव्हळण्याचा आवाज झाला. ते धावत - पळतच घटनास्थळी पोहचले. समोर जे दृश्य होते ते बघून त्यांचा अक्षरशा थरकापच उडाला. बिबट्याच्या तावडीत बैल...अन् जीव सोडवण्यासाठी सुरु असलेली बैलाची धडपड अंगावर काटा आणणारी होती. ते बैलाची सोडवणूक करण्यासाठी पुढेही सरसावले मात्र, बिबट्या त्यांच्यावरही धावून आल्याने त्यांना तेथून पळ काढावा लागला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे. मालकांनी जनावरांना मोकाट न सोडता गावातच चरण्यास सोडावे असे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.
किमान सात आठ बिबट्यांचा वावर
वर्षभरापासुन संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात किमान सात आठ बिबट्यांचा वावर तालुक्यातील वावीहर्ष परिसरापासून ते गडदवणे परिसरापर्यंत बिबटे फिरत असुन ब्रम्हगिरीच्या भातखळ्यात बिबट्याने गाय ठार केली होती. यापुर्वी येथील ब्रम्हगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या मुक्तादेवीच्या मंदीराजवळ रात्री बिबट्याने एक गाय ठार केली होती. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात बिबटे, तरस, मोर, ससे, रानडुकरे आदी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात बिबटे जनावरांचा फडशा पाडत शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. बेझे, चाकोरे, वाघेरा, वळणगावचे पाडे आदी ठिकाणी घटना घडल्या आहेत. चार महिन्यांपुर्वी नाशिक त्र्यंबक रस्त्यावर एक बिबट्या अज्ञात वाहन धडकेने बिबट्या ठार झाला होता.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.