esakal | त्र्यंबकेश्वरच्या रथोत्सवामुळे कापूर वाती जाळण्यास प्रतिबंध; सॅनिटाइज मंदिर परिसरात आगीचा धोका  
sakal

बोलून बातमी शोधा

trimbak rathostv.jpg

त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीतील भाविकांचा हा उत्सव असून, बाहेरील भाविक नगण्य संख्येने येतात. स्थानिक भाविक चातुर्मास समाप्ती व शिवशंकराचा विजय उत्सव म्हणूनही हा उत्सव दिवाळी म्हणूनच साजरा होतो,

त्र्यंबकेश्वरच्या रथोत्सवामुळे कापूर वाती जाळण्यास प्रतिबंध; सॅनिटाइज मंदिर परिसरात आगीचा धोका  

sakal_logo
By
कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्‍वर ( जि.नाशिक) : त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचा दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला होणारा रथोत्सव यंदा येत्या रविवारी (ता.२९) होणार आहे. मात्र कोरोनामुळे त्यावर प्रतिबंध असून, बुधवारी (ता.२५) पोलिस अधिकाऱ्यांनी येथे पाहणी केली.

सॅनिटाइज मंदिर परिसरात आगीचा धोका 

त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीतील भाविकांचा हा उत्सव असून, बाहेरील भाविक नगण्य संख्येने येतात. स्थानिक भाविक चातुर्मास समाप्ती व शिवशंकराचा विजय उत्सव म्हणूनही हा उत्सव दिवाळी म्हणूनच साजरा होतो, त्याबाबत बुधवारी देवस्थान कार्यालयात बैठक झाली. उत्सवात खंड पडू नये म्हणून मर्यादित स्वरूपात साजरा होईल. रथ मंदिरापासून कुशावर्ततीर्थ तेथून परत मंदिरात येईल. भाविकांना घराजवळून बघता येईल. रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड्स करण्यात येणार असून, रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे पालिकेला सांगण्यात आले. महिलांनी त्रिपुरवाती घरीच जाळाव्यात, मंदिर परिसरात सॅनिटाइजर केले जाते. सामाजिक मंडळे करीत असलेले पेढेवाटप, आरती यास मनाई असणार आहे.  

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

रथमार्गाची पाहणी

पालिका मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल, संतोष कदम, पंकज भुतडा, दिलीप तुंगार, तृप्ती धारणे, प्रांत चव्हाण, विभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर ढोले, पोलिस निरीक्षक कातकाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मांढरे आदींची बैठक होऊन रथमार्गाची पाहणी करण्यात आली.

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद