थरारक! नाशिक-पुणे महामार्गावर अपघात; नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट व्यापारी संकुलात

राजेंद्र अंकार
Sunday, 18 October 2020

सकाळीची वेळ...राख वाहून नेत असलेल्या ट्रकच्या वाहनचालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात ट्रक समोर असलेल्या वस्तूंचा चुराडा करत थेट व्यापारी संकुला घुसला. वाचा काय घडले?​

नाशिक : सकाळीची वेळ...राख वाहून नेत असलेल्या ट्रकच्या वाहनचालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात ट्रक समोर असलेल्या वस्तूंचा चुराडा करत थेट व्यापारी संकुला घुसला. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर महाविद्यालयासमोर रविवारी (ता. 18) सकाळी साडेसातच्या सुमारास राख वाहुन नेणा-या आयवा ट्रकने सात वाहनांना धडक दिली. चालकाचा ताबा सुटूल्याने ट्रक व्यापारी संकुला घुसली. अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वृद्ध महिलेची चहाची टपरी होती. ट्रक टपरीला धडक देताच ती महीला खाली पडली. मात्र प्रसंगावधान दाखवून तात्काळ उठून बाजुला धाव घेतल्याने जीव वाचला. पद्मा साखरे असे त्या महिलेचे नाव. चहाच्या टपरीच्या व्यवसायावर महिला संसाराचा गाडा चालवत होती. आतातर ट्रकने तिची टपरीच चक्काचुर झाली. पुढे थेट ट्रकने संकुलातील गॅरेजसमोर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकीही चिरडल्या. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडताच चालकाने तेथून पळ काढला. पोलिस पोहचले असुन चौकशी सुरु आहे.

हेही वाचा >  दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck accident on Nashik-Pune highway nashik marathi news