थरारक! ट्रक-चारचाकीचा मोठा अपघात; अपघातग्रस्तांच्या किंचाळण्याने हादरला परिसर

विनोद बेदरकर
Monday, 21 September 2020

त्या वेळी द्वारकेकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच ४३ ई ५४१) चारचाकीस चालकाच्या विरुद्ध दिशेने जोरदार धडक देत फरफटत नेले. चारचाकीतील कुटुंबीयांच्या किंचाळ्याने परिसर हादरून गेला.

नाशिक : (जुने नाशिक)  दुपारची वेळ...रहदारीच्या रस्त्यावर ट्रक-चारचाकीचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात इतका भीषण होता की संपुर्ण परिसर कुटुंबीयांच्या किंचाळल्याने पुरता हादरून गेला होता.

अशी आहे घटना

रविवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास सारडा सर्कल चौकात 'वेळ आली होती; पण काळ नव्हता' असा प्रसंग नागरिकांना अनुभवास मिळाला. सागर कोमलसिंग परदेशी (रा. हुंडीवाला लेन) कुटुंबीयांसह चारचाकीने (एमएच १५ एफएफ २९९७) मदिना चौकाकडे जात होते. त्या वेळी द्वारकेकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच ४३ ई ५४१) चारचाकीस चालकाच्या विरुद्ध दिशेने जोरदार धडक देत फरफटत नेले. चारचाकीतील कुटुंबीयांच्या किंचाळ्याने परिसर हादरून गेला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत परदेशी कुटुंबीयांना बाहेर काढले. अपघातात चारचाकीची काच फुटली तसेच टायर निघाले. अपघातामुळे सुमारे अर्धा तास सारडा सर्कल चौकात वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकचालकाने मद्यसेवन केले असल्याचे परदेशी कुटुंबीयांनी सांगितले. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

मोठा अनर्थ टळला, कुटुंब बचावले... 

खडी डंपरची वाहतूक करणारा ट्रक आणि चारचाकी वाहनांत जोरदार धडक होऊन चारचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने चारचाकीतील परदेशी कुटुंबीय बचावले. अपघात आणि परदेशी कुटुंबीयांच्या किंचाळीने परिसर हादरून गेला. नागरिकांच्या मदतीने चारचाकीतील सर्वांना बाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck-four-wheeler accident at Sarda Circle nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: