मी आयबीचा माणूस..मला सीपी साहेबांना गोपनीय माहिती द्यायचीय..अन् मग गोंधळच..

police-commissioner-office-nashik-.jpg
police-commissioner-office-nashik-.jpg
Updated on

नाशिक : मी पोलिस अधिकारी असून, मला पोलिस आयुक्तांना गोपनीय माहिती द्यायची आहे, असे सांगून पोलिस आयुक्तालयात प्रवेश केला..आणि मग सगळा गोंधळच झाला.. 

पोलिस आयुक्तालयात नुसता गोंधळच गोंधळ.. असा घडला प्रकार
राजेश बन्सीलाल वाघ (वय 31, रा. एसएसबी-13, अश्‍विनीनगर, सिडको) असे गोंधळ घालणाऱ्या व्यक्‍तीचे नाव आहे. गुरुवारी (ता. 2) रात्री अकराच्या सुमारास राजेश वाघ पोलिस आयुक्त कार्यालयाजवळ आला. या वेळी हवालदार भरत अहिरे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संरक्षण गार्ड म्हणून ड्यूटी बजावत होते. या वेळी वाघ याने मी आयबीचा माणूस असून, मला सीपी साहेबांना गोपनीय माहिती द्यायची आहे, असे सांगितले. त्याला नियंत्रण कक्षात घेऊन जात असताना त्याने पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूम पॅसेजमध्ये आरडाओरडा केला. या गोंधळाने पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी पॅसेजमध्ये जमा झाले. वळवी यांनी त्याच्या कामाबद्दल विचारणा केली असता त्याने आपले नाव व कामाबाबत मी तुम्हाला काही सांगणार नाही, असे सांगून गोंधळ सुरूच ठेवला. तुम्ही मला सॅल्यूट का ठोकला नाही, अशी विचारणा करून सीपी साहेबांना येथे बोलावून घ्या, असे म्हणून पोलिस गार्डच्या अंगावर धावून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. गोंधळ घालणाऱ्या वाघ याला त्याच्या आयकार्डाबाबत विचारणा केली असता त्याने आयकार्डाऐवजी आधारकार्ड दाखविले. गोंधळानंतर संशयिताला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com