विविध झेंड्यांच्या विक्रीतून रोजगारनिर्मिती...'या' कुटुंबीयांनी व्यवसायात रोवला झेंडा!.. 

flag business.jpg
flag business.jpg
Updated on

नाशिक : घरोघरी दही, पाव, किराणा असे साहित्यांचा पुरवठा करणारे सातपूर येथील चौधरी कुटुंबीय आता शिवजयंती निमित्त लागणाऱ्या एक ते दीड लाख भगव्या झेंड्यांच्या ऑर्डर पूर्ण करीत आहेत. बेताची परिस्थिती असूनही हार न मानता आलेल्या समस्यांना तोंड देऊन नाशिक येथील झेंड्याच्या व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे विनोद चौधरी व कुटुंबीयांनी युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 

अनेक प्रकारचे कष्टमय जीवन 

शहरात सध्या शिवजयंतीची जल्लोषात तयारी सुरू आहे. यानिमित्त ठिकठिकाणी फडकणारे भगवे झेंडे लक्षवेधी ठरतात. असे झेंडे बनवताना सातपूर येथील चौधरी कुटुंबीयांनी या व्यवसायात आपले पाय रोवले आहेत. सोबत परिसरातील अन्य काही महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात शिवजयंती उत्सव काहीच दिवसांवर आला आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी झेंडे विक्रीस सुरवात झाली आहे. हे झेंडे बनविण्यासाठी दोन ते तीन महिने आधीपासून सातपूर कॉलनी मधील चौधरी कुटुंबीय सुरवात करतात. चौधरी यांची परिस्थिती बेताची; मात्र, लहानपणापासून दही, पाव विकणे, किराणामाल पोचवणे असे अनेक प्रकारचे कष्टमय जीवन जगत घराचा गाडा ओढणारे विनोद चौधरी गेल्या पंधरा वर्षांपासून सातपूर कॉलनी परिसरात प्रिंटिंग प्रेसचे काम घरातच करत आहेत. मात्र, यातून घराचा खर्च भागत नसल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी झेंडे बनविण्याचे काम हाती घेतले.

झेंडे बनविण्यासाठीचे कापड मुंबईवरून आणले जाते

हळूहळू या झेंड्यांची मागणी चांगलीच वाढू लागली. त्यातून मागणी दिवसेंदिवस वाढत जाऊन नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभर ते झेंडे विक्री करू लागले आहेत. शिवजयंती च्या निमित्ताने साधारणतः एक ते दीड लाख झेंड्यांची ऑर्डर्स ते पूर्ण करत आहेत. झेंडे बनविण्यासाठीचे कापड मुंबईवरून आणले जाते. त्यानंतर ते कपडा मागणीनुसार मीटरप्रमाणे कापून शिवण्यासाठी महिलांकडे देण्यात येते. यातून परिसरातील दहा ते बारा महिलांना महिन्याला अडीच ते तीन हजारांपर्यंत रोजगार दिला जातो. हे झेंडे शिवून झाल्यावर ग्राहकांच्या आवडीनुसार त्यावर आकर्षक डिझाइन काढून देण्यात येते. शिवजयंती, हनुमानजंयती, 14 एप्रिलसाठी लागणारे सर्व प्रकारचे झेंडे चौधरी कुटुंबीय बनवून देतात. वर्षभरात साधारणतः एक ते दीड लाखांची उलाढाल व्यवसायातून होते. नाशिक जिल्ह्यासह मुंबई, जळगाव, धुळे येथे झेंडे निर्यात केले जातात. 

पन्नास ते साठ हजारांची उलाढाल 

दोन मीटर झेंडा 160 रुपये 
एक मीटर झेंडा 80 रुपये 
अर्धा मीटर झेंडा 60 रुपये 
पाव मीटर झेंडा 40 रुपये 
बाइक झेंडा 30 रुपये 
शिवजयंतीनिमित्त साधारणतः पन्नास ते साठ हजारांची उलाढाल 
शहरासह मालेगाव, सायखेडा, त्र्यंबक, चांदवडसह इतर तालुक्‍यांमधून मोठी मागणी 
 
थ्रीडी प्रिंटिंगला मोठा प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त झेंड्याना चांगलीच मागणी आहे. मागच्या वर्षीपेक्षा कापड महाग झाल्याने किंमती वाढल्या आहेत. तसेच, तरुणांकडून थ्रीडी प्रिंटिंगला मोठा प्रतिसाद दिला जातोय. - विनोद चौधरी, व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com