रविवारचा दिवस ठरला चिंताजनक! एकाच दिवशी 'इतक्या' कोरोनाबळींनी हादरला  जिल्हा

corona suicide.jpg
corona suicide.jpg

नाशिक : रविवार (ता. 31)चा दिवस नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढविणारा ठरला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बिहारमधील दोघे, मालेगावातील मृत्युपश्‍चात पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले सात आणि रावळगाव (ता. मालेगाव), राजूळ (ता. नाशिक) व नांदगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 73 झाली आहे. 

मालेगावातील आधीच्या मृत सात रुग्णांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह 
रविवारी सायंकाळपर्यंत नाशिक-मालेगावसह जिल्ह्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यात, वडाळा गावात आणखी 10 आणि जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असलेल्या मालेगावातही सायंकाळी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नाशिक शहरात एकूण 21 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, वडाळा गाव, तसेच वडाळा नाका येथील दोन रुग्ण आहेत. यात एका नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पाथर्डी फाटा येथे दोन, म्हसरूळला दोन, अशोका मार्ग- एक, गोसावीवाडी (नाशिक रोड)- एक, सिडकोतील विनयनगरमध्ये दोन व लेखानगरमध्ये एक रुग्ण कोरोनाबाधित आहे. तत्पूर्वी, सकाळी शहरातील आठ, सटाण्यात दोन, दापूर (ता. सिन्नर) येथे एक, दहीवड (ता. देवळा) येथे 70 वर्षीय पुरुष आणि मालेगावातील पोलिस कर्मचारी असे 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील पंचशीलनगर, गंजमाळ येथील 35 वर्षीय महिला, शिंगाडा तलावासमोरील 46 वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालयातील 32 वर्षीय आरोग्यसेवक, मखमलाबाद रोडवरील ओम गुरुदेवनगरातील दोन युवक, 46 वर्षीय महिला, लेखानगरमधील दोन युवकांसह महिला कोरोनाबाधित आहेत. शहरात सध्या 49 प्रतिबंधात्मक क्षेत्रे असून, रुग्णांची संख्या 193 आहे. 

तीन तालुक्‍यांत नाही बाधा 
जिल्ह्याच्या 12 तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्‍वर या तीन तालुक्‍यांत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांमध्ये थोड्याफार फरकाने कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण येवल्यात अधिक आहे. 

मालेगावात वाढली कोरोनाबळींची संख्या 
मालेगाव : शहरातील कोरोनाबळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत मृत्यू झालेल्या सहा संशयितांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. यात पाच महिलांचा समावेश आहे. यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या 55, तर संशयित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 68 झाली आहे. दरम्यान, रविवारी 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात, 10 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. शहरातील गिलाणकरनगर, एसआरपी कॅम्प, आयेशानगर, द्याने, कुरेशाबाद, अश्रफनगर, तर संगमेश्‍वर भागातील खारकरवाडीतील चार व सय्यदनगरातील तीन अशा पूर्व-पश्‍चिम दोन्ही भागातील रुग्णांचा यात समावेश आहे. रुग्णांमध्ये आठ, दहा, 15 वर्षे वयाची तीन मुले व 14 वर्षांचे दोघे आहेत. 


मृत्यूनंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सहा रुग्णांमध्ये गोल्डननगरमधील 48 वर्षीय व हुडको कॉलनीतील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू 1 मेस झाला आहे. गलशने इब्राहिम भागातील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू 2 मेस, दातारनगर भागातील 55 वर्षीय पुरुषाचा 12 मेस, इस्लामपुरा भागातील 60 वर्षीय महिलेचा 27 एप्रिलला, तर नवापुरा भागातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 28 एप्रिलला झाल्याचे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्याधिकारी सपना ठाकरे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com