esakal | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कारवाई.. बारा गोवंश, दोन वाहनांसह अकरा लाखांचा ऐवज जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

crime 1234.jpg

शहरातील गौसे आजमनगर व म्हाळदे शिवार या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलिसपथकाने छापा टाकून १२ गोवंश, दोन पिक-अप वाहनासह ११ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कारवाई.. बारा गोवंश, दोन वाहनांसह अकरा लाखांचा ऐवज जप्त 

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : शहरातील गौसे आजमनगर व म्हाळदे शिवार या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलिसपथकाने शुक्रवारी (ता. ३१) छापा टाकून १२ गोवंश, दोन पिक-अप वाहनासह ११ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जनावरांचा मालक फरार 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी ही जनावरे शहरात अवैधरीत्या आणून जखडून ठेवली होती. म्हाळदे शिवारात मोहंमद रिहान अब्दुल रहेमान (वय २४, मोहनबाबानगर) याच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीचे सात गोवंश व तीन लाखांची पिक-अप असा सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रिहानला अटक झाली असून, जनावरांचा मालक शाहीद शेठ (रा. म्हाळदे शिवार) फरारी आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
दुसऱ्या कारवाईत गौसे आजमनगरात याच पथकाने छापा टाकून बिलाल शेख कादर (३२, रा. नया स्लॉटर हाउस) यांच्या ताब्यातून दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे पाच गोवंश, अडीच लाख रुपयांची पिक-अप असा सुमारे चार लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. बिलालला अटक करण्यात आली आहे. जनावर मालक मोबीन मसूद खान फरारी आहे. या दोन गुन्ह्यांप्रकरणी आयेशानगर पवारवाडी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - ज्योती देवरे