
मुलीच्या वाढदिवसाची घरात तयारी सुरु होती , सर्व नातेवाईकही जमा झाले होते. बारा वर्शाचा रमेश हा त्याच्या भावासोबत खेळायला गेला.. अन् क्षणात सगळ्याच्या आनंदावर विरजन पडंल आणि होत्याचं नव्हतं झालं..
नगरसूल (नाशिक) : मुलीच्या वाढदिवसाची घरात तयारी सुरु होती , सर्व नातेवाईकही जमा झाले होते. बारा वर्शाचा रमेश हा त्याच्या भावासोबत खेळायला गेला.. अन् क्षणात सगळ्याच्या आनंदावर विरजण पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं..
रेंडाळे (ता. येवला) येथे सुनील आहेर राजस्थानमध्ये सैन्यदलात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते गावी आले होते. त्यांची मुलगी सोनाक्षी (१०) हिचा मंगळवारी वाढदिवस असल्याने कार्यक्रमाची तयारी असतानाच रोशन व त्याचा चुलत भाऊ यश वस्तीच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या कडेला खेळायला गेले होते तेथे अचानक तोल गेल्यामुळे शन सुनील आहेर (वय १३) या मुलाचा मंगळवारी (ता. ८) पाण्यात बुडाला.
हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही
याबाबत यशने धावत येऊन कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास एक तासाच्या अथक परिश्रमानंतर रोशनचा मृतदेह स्थानिक तरुणांनी शोधून काढला. बहिणीच्या वाढदिवशीच एकुलत्या भावाचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगरसूल पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळल