'आई - बाबा मी का नको तुम्हाला?'... लुकलुकते डोळे विचारताय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

एखादं चिमुरडं बाळ जेव्हा बेवारस सापडतं तेव्हा प्रश्न पडतो की, अजूनही माणुसकी शिल्लक आहे?... निष्पाप एवढ्याशा जीवाला किड्यामुंग्यासारखं मरण्या साठी सोडून देतांना जरासुध्दा लज्जा शिल्लक नसावी. असाच प्रकार दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात बेवारस बाळ आढळून आले आहे. या बाळांवर उपचार केल्या नंतर आधाराश्रम संस्थेत दाखल कले आहे.

नाशिक : एखादं चिमुरडं बाळ जेव्हा बेवारस सापडतं तेव्हा प्रश्न पडतो की, अजूनही माणुसकी शिल्लक आहे?... निष्पाप एवढ्याशा जीवाला किड्यामुंग्यासारखं मरण्या साठी सोडून देतांना जरासुध्दा लज्जा शिल्लक नसावी. असाच प्रकार दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात बेवारस बाळ आढळून आले आहे. या बाळांवर उपचार केल्या नंतर आधाराश्रम संस्थेत दाखल कले आहे. बालकांच्या पालकांनी घारपुरे घाट येथील आधाराश्रम संस्थेकडे तीस दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

पहिली घटना : लासलगाव रेल्वे पोलिस ठाणे येथे बेवारस व विनापालक

आठ दिवसांची दुर्गा गेल्या 24 जानेवारीला मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यामार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रम दत्तक ग्रहण संस्थेत दाखल झाली होती. बालिकेला 23 जानेवारीला लासलगाव रेल्वे पोलिस ठाणे येथे बेवारस व विनापालक आढळल्याने तिला लासलगाव ग्रामीण रूग्णालय लासलगावला दाखल केले होते. तेथून सोडल्यानंतर आधाराश्रम संस्थेत दाखल केले आहे. 

दुसरी घटना : मुंबई-आग्रा हायवेच्या कडेला हॉटेल शिमला इन समोर उघड्यावर काटेरी झुडपात टाकलेली

सहा महिन्यांचा साहील हा बालक 31 जानेवारीला मालेगाव पोलीस ठाण्यामार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रम दत्तक ग्रहण संस्थेत दाखल झाला होता. या बालकास 29 जानेवारी सायने बुद्रुक शिवारात मुंबई-आग्रा हायवेच्या कडेला हॉटेल शिमला इन समोर उघड्यावर काटेरी झुडपात टाकलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याला सामान्य रुग्णालय मालेगावला दाखल केले होते. त्यानंतर आधाराश्रम संस्थेत दाखल करण्यात आले. 

हेही वाचा > 'आधी माहीत असतं तर तुला मी पाठवलंच नसतं!'...असं म्हणत आईने फोडला हंबरडा

पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार

बालकांच्या पालकांनी आधाराश्रम संस्था घारपुरे घाट येथे 0253-2580309 या ठिकाणी अथवा नाशिक-पुणे मार्गावरील मुलींचे अनुरक्षण गृहाजवळील जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे 0253-2236368 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दावा करण्यास कोणी आले नाही, तर बालकांना कोणीही पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येईल, असे कळविले आहे.

हेही वाचा > जन्मदात्याचे चांगलेच फेडले पांग!...प्रॅापर्टीसाठी केला अमानुषपणाचा कहर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two babies were found in the district nashik marathi news