लग्नाचे स्वप्न अपूर्णच!...नुकताच साखरपुडा झाला होता 'त्याचा'..

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

आकाश गवळीचा रविवारी साखरपुडा होता, अशी चर्चा घटनास्थळी होती. आकाशचे वडील रिक्षाचालक आहे. आई, एक भाऊ आहे. आदर्श कराड यांची आई भाजीपाला व्यवसाय करते. तर त्याला वडील, एक भाऊ आहे. आदर्श हा आरंभ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 

नाशिक : चेहेडी पंपिंगजवळ डंपरखाली मोटारसायकल सापडून शुक्रवारी (ता. 14) झालेल्या अपघातात दोन तरुण ठार, तर एक जखमी झाला. जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. ट्रकचालक फरारी आहे. यापैकी मृत आकाश गवळीचा रविवारी साखरपुडा होता, अशी चर्चा घटनास्थळी होती. आकाशचे वडील रिक्षाचालक आहे. आई, एक भाऊ आहे. आदर्श कराड यांची आई भाजीपाला व्यवसाय करते. तर त्याला वडील, एक भाऊ आहे. आदर्श हा आरंभ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 

तिन्ही तरुण महाविद्यालयात विद्यार्थी
नाशिक रोडजवळ पुण्याकडून चेहेडी पंपिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर खर्जुल मळ्याजवळ गजानन पार्क अपार्टमेंटसमोरून एक डंपर (एमएच 06, एक्‍यू 9394) जात असताना मोटारसायकल (एमएच 15, सीएच 8869 ) अचानक डंपरखाली सापडली. त्यात मोटारसायकलवरील तीन तरुण आदर्श कराड (वय 17), आकाश गवळी ( 22) हे दोघे जागीच ठार झाले, तर ज्ञानेश्‍वर केदारे (वय 24) गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे तिन्ही तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत होते. पोलिस निरीक्षक सूरज बिजली, वाहतूक निरीक्षक के. डी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आर्दश कराड व आकाश गवळी यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने बिटको रुग्णालयात गर्दी केली होती. 

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two dead in motorcycle accident near Pumping Chehedi One was injured Nashik Marathi News