मध्यरात्रीची वेळ...संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असतांना 'त्याने' साधला डाव...थरारक घटना

4leopard_20terror.jpg
4leopard_20terror.jpg

नाशिक : (विराणे) मध्यरात्रीची वेळ...संपूर्ण कुटुंबीय गाढ झोपेत असतांनाच तो दब्या पावलांनी आला. कुणाला जरा सुध्दा भनक न लागू देता काही क्षणातच त्याने केला असा प्रकार..परिसरात खळबळ  

अशी घडली घटना

वळवाडी येथील शेतकरी प्रविण पाटील यांच्या शेतात मध्यरात्रीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. गुरुवारी (ता. 30) रात्री अंधाराचा फायदा घेत बिबट्याने कुंपन जाळी तोडत वाड्यात प्रवेश केला. पाटील कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच बिबट्याने आपला कार्यक्रम केला. वनपाल नंदिनी बच्छाव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वळवाडी व गारेगाव दरम्यानच्या शेतशिवारात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. गेल्या पंधरा दिवसांपासून येथे बिबट्या शेतकऱ्यांना आढळत आहे. पिके मोठी झाली असल्याने शेतकरी जीव मुठीत धरून शेतात जात असतात. तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी केली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com