कोरोना हॉटस्पॉटहून दोघे पिता-पुत्र 'या' गावात दाखल अन् चौकशी केली तेव्हा...

father and son village.jpg
father and son village.jpg
Updated on

नाशिक / विंचूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असूनही नागरिक शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून या गावावरून त्या गावाला ये-जा करीत आहेत. अशाच दोन व्यक्ती कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाववरून विंचूर येथे दाखल झाल्यामुळे विंचूर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नेमके काय घडले?
विंचूरचे रहिवासी असलेले एक कुटुंब गेल्या सात-आठ महिन्यांपासून मालेगाव येथे वास्तव्यास आहे. या कुटुंबातील पिता-पुत्र असे दोघे दुचाकीवरून सकाळी सातच्या सुमारास विंचूरमध्ये दाखल झाले. त्यांना येथे बघताच नागरिकांची भीतीने गाळण उडाली. नागरिकांनी पत्रकारांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पत्रकारांनी ग्रामविकास अधिकारी व पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार हे आरोग्य कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी हजर झाले.

संबंधित व्यक्तींची चौकशी केली असता या दोहोंपैकी एकाची बायपास सर्जरी झालेली असून, त्यांची तपासणी व औषधे घेण्यासाठी त्यांना नाशिक येथे जायचे होते, असे समजले. यामुळे त्यांची येथील शासकीय दवाखान्यात योग्य ती तपासणी करून त्यांना नाशिककडे पाठविले. त्यानंतर परिसरात ग्रामपालिकेने जंतुनाशक फवारणी केली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेले आहे. त्यामुळे मालेगाव शहराला कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. असे असतानाही या दोन व्यक्ती येथे आल्याच कशा, असा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com