शिटी वाजवून "तो' तिला अश्लील चाळे करून दाखवत होता...वडिलांनी जाब विचारल्यास त्याने चक्क..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

बुधवारी (ता. 18) रात्री साडेआठच्या सुमारास धर्माजी कॉलनीत पीडित मुलीचा संशयित भूषणने पाठलाग केला आणि शीळ वाजवून तिच्याकडे पाहत अश्‍लील चाळे केले. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता संशयिताने तर चक्क...

नाशिक : गंगापूर हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत एका अल्पवयीन मुलीसह एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

धर्माजी कॉलनीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण निकम असे संशयिताचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. 18) रात्री साडेआठच्या सुमारास धर्माजी कॉलनीत पीडित मुलीचा संशयित भूषणने पाठलाग केला आणि शीळ वाजवून तिच्याकडे पाहत अश्‍लील चाळे केले. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता संशयिताने दमदाटी केली.

हेही वाचा > पान खाल्ल्यानंतर जिभेवर चुना लावून द्राक्षबागेचा व्यवहार करत 'त्याने' शेतकऱ्यांनाच लावला चुना!

तर दुसऱ्या घटनेत मनोज गायकवाड (वय 18, रा. जाधव मळा, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव असून पीडितेच्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास पीडित युवती आनंदवली बसस्टॉप ते टेलिफोन ऑफिस रस्त्याने जात असताना, संशयित मनोजने तिचा पाठलाग केला आणि लग्नाची मागणी केली, पीडितेने नकार दिला. संशयिताने पीडितेच्या आई व भावाला शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिली. या दोन्ही प्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two minor girls molested nashik crime marathi news