जीवनाचा शेवटही मित्रांसोबतच! दोन्ही शाळकरी मित्रांची एकत्रच अंत्ययात्रा; गावाने फोडला हंबरडा

विजयराम काळे
Thursday, 24 September 2020

सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत अंघोळ करायला तीन मित्र गेले. सदैव एकत्र राहणाऱ्या मित्रांचा हात जीवनाच्या शेवटीही घट्टच होता. त्यांच नदीवर अंघोळ करणं त्यांच्या जीवावर बेतले आहे. काय घडले वाचा..​

नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत अंघोळ करायला तीन मित्र गेले. सदैव एकत्र राहणाऱ्या मित्रांचा हात जीवनाच्या शेवटीही घट्टच होता. त्यांच नदीवर अंघोळ करणं त्यांच्या जीवावर बेतले आहे. काय घडले वाचा..
 

नदीवर अंघोळ करणं बेतले जीवावर
ओम काशीनाथ भालेराव (वय १३, इयत्ता सातवी) आणि धीरज आप्पा खैरनार (वय १४, इयत्ता आठवी), वैभव वसंत वाघ (वय १२)अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.  हे तिघे शेलू नदीत अंघोळ करत असताना पाय घसरून नदीत पडले. ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी तातडीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओम व धीरज यांचा मृत्यू झाला होता. सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत अंघोळ करताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत गेलेला वैभव वाघ याला वाचविण्यात यश आले आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

दोघांवर सेलू येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार

अरुण मांगू माळी आणि बाळू भालेराव यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. चांदवड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांवर सेलू येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दोघेही मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील होते. ओम हा एकुलता मुलगा होता. दोन्ही कुटुंबीयांना शासनाने योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी संजय भांबर व शंकर जाधव यांनी केली आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

देवनदीत तरुण गेला वाहून 

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण पाण्यात बुडाले असून, सेलू (ता. चांदवड) येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तर, वडांगळी येथे देवनदीत एक तरुण वाहून गेला आहे. त्याचा अद्याप शोधही लागला नाही, तसेच ओळखही पटलेली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two school children die in Seleu river nashik marathi news