कोरोनाच्या काळातही पांढऱ्या सोन्याची विक्री अनलॉकच! जिल्हा उपनिबंधकांची माहिती

cotton farmer.jpg
cotton farmer.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या काळातही पांढऱ्या सोन्याची विक्री सुरू होती. शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळावा म्हणून मालेगाव येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव खरेदी केंद्रात जिल्ह्यातील एक हजार ९२९ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी ही माहिती दिली. 

गौतम बलसाने : हमीभावासाठी योजनेची अंमलबजावणी 
बलसाने म्हणाले, खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव देण्यासाठी सरकारने मालेगावमधील युनायटेड कॉटन एक्सट्रॅाट लिमिटेड (चाळीसगाव फाटा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली. खरेदी केंद्राचा लाभ मालेगाव, नांदगाव आणि येवला तालक्यांतील शेतकऱ्यांना झाला. कोरोना प्रादुर्भावाअगोदर एक हजार २२१ शेतकऱ्यांकडून ३९ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पुढे ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कापसाला प्रतवारीनुसार हमीभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात 'तो' वेदनेने विव्हळत होता...पण माणुसकी हरली..वाचा काय घडले
कापसाच्या गाठी करणार 
कापूस खरेदीसाठी एकूण एक हजार ३६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १३९ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे अजून शिल्लक आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसावर कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्याच्या गाठी तयार केल्या जात असल्याचेही श्री. बलसाने यांनी सांगितले. ते म्हणाले, की खरेदी केंद्रात कापसाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यांतील शिल्लक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा. 

या केंद्रात काय असेल?

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com