हायस्कूलजवळच पोलीसांना सापडला सराईत गुन्हेगार; पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे जप्त

प्रमोद सावंत
Wednesday, 4 November 2020

शहरातील बडी मालेगाव हायस्कूलजवळील पत्र्याच्या शेडजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता हिफजू रहेमान मोहंमद इद्रीस  याला शिताफीने अटक केली

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील बडी मालेगाव हायस्कूलजवळील पत्र्याच्या शेडजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता हिफजू रहेमान मोहंमद इद्रीस (वय २६, रा. गल्ली नं. ११, नयापुरा) याला शिताफीने अटक केली.

गुन्हा करण्याच्या हेतूने आणले पिस्तुल

या पथकाने त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीची दोन पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, तसेच पल्सर दुचाकी (एमएच १८, बीक्यू ७४१०) जप्त केली. गावठी पिस्तूल व दुचाकीसह सुमारे ९१ हजार ५०० रुपयांचा हा ऐवज आहे. हिफजूविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिफजूने गुन्हा करण्याच्या हेतूने हे गावठी पिस्तूल आणल्याचे समजते. रविवारी पहाटे पवारवाडी पोलिसांनीही इब्राहिम अहमद अब्दुल गणी ऊर्फ दुर्री या सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्या ताब्यातून गावठी बंदूक व एक जिवंत काडतूस जप्त केले होते. दुर्रीने विक्री करण्याच्या उद्देशाने कट्टा बाळगला होता. दोन दिवसांत शहरात तीन गावठी बंदुका जप्त झाल्या आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

पोलीसांच्या पथकाने केली कारवाई

मंगळवारी (ता. ३) पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, हवालदार सुहास छत्रे, पोलिस नाईक चेतन संवत्सकर, गिरीश बागूल, रतिलाल वाघ, दत्ता माळी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two village pistols three cartridges seized malegaon nashik marathi news