थरारक! जेव्हा चालत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

विवेकानंदनगरजवळील एकता चौकाजवळ घडली घटना. दुपारच्या सुमारास एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने सर्वांचीच धावपळ झाली. मात्र दैव बलत्तर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडून पळ काढल्याने तो बचावला. हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाचा नेमके काय घडले? 

सिडको (नाशिक) : विवेकानंदनगरजवळील एकता चौकाजवळ घडली घटना. दुपारच्या सुमारास एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने सर्वांचीच धावपळ झाली. मात्र दैव बलत्तर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडून पळ काढल्याने तो बचावला. हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाचा नेमके काय घडले? 

अशी आहे घटना

चालत्या दुचाकीने अचानक रस्त्यात पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी विवेकानंदनगरजवळील एकता चौकाजवळ घडली. वेळीच तरुणांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. राजू घुटने आपल्या ॲक्टिवावरून (एमएच १५, डीजी ३८८३) जात होते. त्या वेळी त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी सोडून आपला बचाव केला. परिसरातील युवकांनी तत्काळ पाणी टाकून आग विझवली व पुढील अनर्थ टळला. अन्यथा गाडीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता होती. रोहन कानकाटे, कुंदन खरे व आधार मेडिकलचे संचालक आधार कुलकर्णी, निखिल पवार, अक्षय कुलकर्णी, अजय गोसावी यांनी मदत केली. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

ऑइल लिक झाल्याने व अंतर्गत वायरीमुळे ठिणगी पडून गाडीला आग लागल्याचे दिसून आले. गाडीने पेट घेतला. आम्ही सर्व मित्रपरिवाराने पाणी व रेती टाकून वेळीच आग विझवली. अन्यथा पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. - रोहन कानकाटे  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A two-wheeler Cidco caught fire nashik marathi news