VIDEO : पोलीसांनाही भावली लॉकडाऊनमधील लग्नाची अनोखी कहाणी! दिल्या हटके शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 29 एप्रिल 2020

गुजरातचा नवरदेव  मुलगा आणि नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील मुलगी यांचा गेल्या रविवारी शुभविवाह निश्चित होता पण लॉकडाऊनमुळे या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते. पण 'तो' आला आणि .. 

नाशिक : गुजरातचा नवरदेव  मुलगा आणि नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील मुलगी यांचा गेल्या रविवारी शुभविवाह निश्चित होता पण लॉक डाउनमुळे या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते. पण 'तो' आला आणि .. 

तो आला अन लग्नही लागले, ​
गुजरातचा निकुंज आणि नाशिकची हरिणी जोशी यांचा विवाह गेल्या रविवारी (ता 26) ठरलेला होता. मात्र कोरोना विषाणूमुळे त्यांच्या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते. मात्र निकुंज याने गुजरात सरकारची परवानगी घेत एकट्याने नाशिक गाठले. अशोका मार्ग येथील हरिणी जोशी या नववधूच्या घरात विवाह सोहळा अतिशय मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. एवढेच नव्हे तर या विवाहासाठी नातलग व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित होत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर पोलिसांनी ही भूमिका पार पाडली

'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी' पोलिसांनी ठरवला संस्मरणीय विवाह,
त्याचवेळी नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, मुंबई नाक्याचे पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस गाड्या अशोका मार्ग येथील जोशी यांच्या अपार्टमेंटच्या खाली पोहोचल्या. पोलीस पाहून अनेकांच्या मनात धडकी भरली मात्र जेव्हा सहाय्यक आयुक्त नखाते यांनी नवदाम्पत्याला पोलिसांकडून शुभाषिश देत असल्याचे माईकवरून सांगितले तेव्हा इमारतीच्या गॅलरीमध्ये नवदाम्पत्यासह अन्य गॅलरीतही रहिवाशी आले आणि टाळ्यांचा गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर पोलिसानि यावेळी 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी' हे गाणे वाजवून नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा संस्मरणीय केला. नाशिक पोलिसांनी केलेल्या या यादगार सोहल्यामुळे नववधू हरिणी जोशी हिचे डोळे आनंदाश्रूनी मात्र पाणावले. यामुळे नाशिक पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unique story of the wedding in Lockdown also touched the nashik police marathi news