कृषी अधिकाऱ्याला दारात बघून विक्रेत्याला फुटला घाम; खरा ठरला संशय

अजित देसाई
Monday, 28 September 2020

या वेळी संबंधित खत विक्रेत्याकडे खत विक्रीचा परवानाच नसल्याचे आढळले. दुकानात बायो इन्ग्रेडियंट गोल्ड प्लसच्या ४० किलोंच्या ८० बॅगा आणि ऑरगॅनिक क्रश्ड सीडच्या २५ किलोंच्या ६० बॅगा याप्रमाणे सेंद्रिय खतांचा साठा मिळून आला. 

नाशिक : (सिन्नर) कृषी अधिकाऱ्याला आधीच भनक लागली. चोरीछुपे त्यांचे काम सुरुच होते. अचानकपणे छापा टाकताच उकलले गूढ. कृषी अधिकाऱ्याला दारात बघून विक्रेत्याला फुटला घाम; खरा ठरला संशय. वाचा काय घडले?

विनापरवाना सेंद्रिय खतविक्री प्रकरणी 'कृषी'कडून तक्रार 
 
शहरातील बारागाव पिंप्री रस्त्यावर बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये आगमा बायोटेक हे खतविक्रीचे दुकान आहे. कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक, जिल्हा कृषी अधिकारी किरण मोहनीराज वीरकर आणि माधुरी रमेश गायकवाड यांनी मंगळवारी (ता. २२) दुपारी या दुकानावर अचानकपणे छापा टाकला. या वेळी संबंधित खत विक्रेत्याकडे खत विक्रीचा परवानाच नसल्याचे आढळले. दुकानात बायो इन्ग्रेडियंट गोल्ड प्लसच्या ४० किलोंच्या ८० बॅगा आणि ऑरगॅनिक क्रश्ड सीडच्या २५ किलोंच्या ६० बॅगा याप्रमाणे सेंद्रिय खतांचा साठा मिळून आला. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

साठेबाजी व विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

सुमारे ८१ हजार ८०० रुपये किमतीच्या खतांची विनापरवाना साठेबाजी करून शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी या खत विक्रेत्याविरोधात कृषी अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दुकानमालक संदीप मारुती सानप यांच्यासह गुजरातमधील परेश कुमार ललितभाई पटेल आणि आगमा बायोटेक कंपनीचे मालक यांच्याविरोधात खतांची विनापरवाना साठेबाजी व विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unlicensed sale of organic manure to Sinnar nashik marathi news