अनलॉक लर्निंग...! आनंददायी शिक्षणगंगा 'आदिवासीं'च्या दारी...

students adiwasi.png
students adiwasi.png

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थी कोरोना संसर्गाच्या काळात शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी आदिवासी विकास विभागाने 'अनलॉक लर्निंग' हा अनौपचारिक शिक्षणाचा प्रकल्प तयार केला आहे. अशा या आदिवासी मुलांसाठीच्या महाराष्ट्रातील प्रकल्पाविषयीची...

आनंददायी शिक्षणासाठी कार्य अन कृतीपुस्तिका

राज्यातील प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी अॉनलाइन, चित्रफिती, शिक्षक भेटी, समाजशिक्षकांचे माध्यम, टीव्ही चॅनल्स, गोष्टींची पुस्तके, मोबाईल, रेडिओ अशा माध्यमांचा उपयोग करुन घेण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी आश्रमशाळेतील शिक्षक पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहेत. विभागाच्या ‘अनलॉक लर्निंग'मध्ये शाळा आणि गावाच्या सामिलकीवर भर देण्यात येणार आहे. शिवाय आनंददायी शिक्षणासाठी कार्यपुस्तिका आणि कृतीपुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या फैलाव वाढलेला असताना एप्रिल ते जूनमध्ये जीवन शिक्षण आणि विषय शिक्षणाचा प्रयोग करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात (शाळा, विद्यार्थी, शिक्षक)

सरकारी आश्रमशाळा ----- ४९७, १ लाख ९० हजार, ४ हजार ९७० 
अनुदानित आश्रमशाळा ----- ५३९, २ लाख ३३ हजार ६२९, ६ हजार ३०१ 
एकलव्य स्कूल ----- २४, ५ हजार, तीनशे

विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन प्रकल्पातून उपलब्ध होणार

राजूर प्रकल्पामध्ये पाच हजार कार्यपुस्तिकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. धारणी प्रकल्पामध्ये सुद्धा प्रयोग झाला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल आत्मियता असलेले अनुभवी शिक्षण अभ्यासक ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक नवनवीन उपक्रम राबवलेले अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांची नियोजन समिती करण्यात आली. त्यांच्या विचारमंथनातून शिक्षणाला जोडणारा अनौपचारिक शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थी शिक्षणाशी जोडले जावेत म्हणून अनौपचारिक पद्धतीने शिकण्यासह अंमलबजाणी-नियोजनाचा आराखडा केला गेला.

शिकणे सुरु ठेवण्यासाठी विभागाचा प्रयत्न

शारीरिक अंतरामुळे निवासी पद्धतीने शाळा सुरु करणे शक्य नसले तरीही शिकणे सुरु ठेवण्यासाठी विभागाचा हा प्रयत्न आहे. शिक्षण अभ्यासकांनी अनौपचारिक शिक्षणाचा संबंध परिसर-कुटुंब आणि जगण्याशी जोडलेला आहे. मुलांना स्वयंअध्ययन, सहअध्यायीसोबत शिकण्याची, जीवनकौशल्याचा विकास, तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन अशा संधी प्रकल्पातून उपलब्ध होणार आहेत. 

विद्यार्थ्यांची माहिती संकलित 

शिक्षकांचे राहण्याची ठिकाण, परिसरातील गावे, विद्यार्थ्यांची घरे आणि इयत्ता अशी माहिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकासच्या शिक्षण विभागाने संकलित केली आहे. मुलांच्या शिक्षणात पालक, स्थानिक सधन व्यक्तींचा सहभाग प्रकल्पात घेतला जाणार आहे. वाचन, लेखन, निरीक्षण, संशोधन, आकलन, अभिव्यक्ती, आरोग्य स्वच्छता, नातेसंबंध अशा जीवनकौशल्यांचा विकास व्हावा यासाठीचा कृती कार्यक्रम तयार झाला आहे. मराठी, इंग्रजी माध्यमसाठी इंग्रजी, मराठी, गणीत विज्ञान आणि एकलव्य स्कूलसाठी इंग्रजी, गणीत, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयाच्या कार्यपुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. मुलभूत संकल्पनावर आधारित अभ्यासक्रमातील शिक्षण त्याद्वारे दिले जाणार आहे. त्याचबरोबर कला, निरीक्षण, संशोधनाला वाव मिळावा म्हणून व्यावहारिक शिक्षणाच्या कृतीपुस्तिका तयार करण्यात आल्यात. या दोन्ही पुस्तिका शिक्षकांनी तयार केल्यात. 

आरोग्य-आहाराची काळजी 

शाळा मुलांपासून दूर राहू नये यासाठी 'अनलॉक लर्निंग' प्रकल्पातंर्गत आरोग्य, आहार, पोषणाची काळजी आदिवासी विकास विभाग घेणार आहे. दोन महिन्यात १ हजार ४०० विद्यार्थ्यांची तपासणी करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे गावस्तरावर आरोग्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी २२० शाळांमधून दिवसाला दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी पथकातर्फे संपर्क साधला जातो. 

मुलांचे सर घरी आले याचा आनंदभाव विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे विद्यार्थी, पालक आणि वसतिगृह याच्यातील ऋणानुबंध मजबूत होण्यास मदत झाली आहे. - विपुल टकले (गृहपाल, घोडेगाव) 

रिपोर्टर - महेंद्र महाजन 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com