पिढी घडविणारे विनानुदानित शिक्षक हतबल; आर्थिक विवंचना व उपासमारीमुळे शेतावर मजुरी

गोपाळ शिंदे
Monday, 12 October 2020

कोरोनाच्या लाटेत विविध क्षेत्रांत आर्थिक विवंचनेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांत काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाशिक / घोटी : कोरोनाच्या लाटेत विविध क्षेत्रांत आर्थिक विवंचनेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांत काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या गावात शाळा आहे, त्याच गावातील शेतात मजुरी करण्याची वेळ पिढी घडविणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील विनाअनुदानित शिक्षकांवर आली आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांची शेतावर मजुरी 
२० वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक तुटपुंज्या वेतनावर सेवाभावी काम करताना, घरातील वृद्ध आई-वडील, मुलांचे शिक्षण, आरोग्य या सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात. पदरी उच्च शिक्षण असूनही आज ना उद्या भविष्य घडेल, या हेतूने कार्यरत असलेल्या शिक्षकांचा स्वप्नभंग झाला आहे. शेतकऱ्यांप्रमाणे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येप्रमाणे शिक्षकांवर आत्महत्यांची वेळ आली आहे. अशी भयावह परिस्थिती आदिवासी ग्रामीण भागातील काही शिक्षक कुटुंबावर आली आहे.

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

आर्थिक विवंचनेमुळे उपासमारीची वेळ 
शाळा-महाविद्यालय बंद आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थांना ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण काम कारणारा शिक्षक आजच्या घडीला मेटाकुटीला आला आहे. आर्थिक विवंचनेमुळे तणावाखाली जगणाऱ्या शिक्षकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. शासनाने तत्काळ याची दखल घेऊन विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान देऊन शिक्षकांचा पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पुढे येत आहे.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unsubsidized teachers work in farm nashik marathi news